शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेत मंजुर झालेले ते ४५ ठराव गेले कुठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 18:06 IST

मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिकेत ठरावांवर चर्चा चांगलीच रंगली असल्याचे दिसत आहे. महापालिकेकडे बोट दाखविणाऱ्या लोकप्रतिनिधींकडूनच सुमापे ४५ ठराव प्रशासनाकडे पाठविले नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा इन्कारमहापौर, सभागृह नेत्यांनीही ठराव नसल्याचे केले स्पष्ट

ठाणे - ठराव मंजुर होत नाहीत, सचिव विभागाकडून ठराव पुढे सरकत नाहीत, असा काहीसा गवगवा मागील कित्येक महिन्यांपासून लोकप्रतिनिधींकडून सुरु आहे. परंतु आता सुमारे ४० ते ४५ ठराव अद्यापही प्रशासनकडे आलेच नसल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात महापौर, सभागृह नेते तसेच विरोधी पक्षनेत्यांनी मात्र आमच्याकडून ठराव पाठविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु ठराव प्रशासनाकडे पोहचलेच नसल्याने ते गेले कुठे असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.             ठाणे महापालिकेची दर महिन्याला २० तारखेला महासभा होत असते. या महासभेत प्रशासनाच्या विविध प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येत असतात. काही प्रस्तावांवर सभागृहात साधकबाधक चर्चा होत असते. त्यानंतर सुचनांसह प्रस्ताव मंजुर केले जातात. काही प्रस्ताव नव्याने सादर करण्यासाठी सांगितले जाते. परंतु असे होऊनही प्रशासनाकडूनच ठरावांची अंमलबजावणी केली जात नाही. काही ठराव शासनाकडे नियोजीत वेळेत पाठविले जात नाहीत. अशी ओरडही महासभेत होतांना दिसून आली आहे.               दरम्यान वारंवार ही ओरड होत असल्याने, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सभागृहाकडून आलेले ठराव मंजुर करुन पुढे पाठविण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पालिकेच्या संबधींत विभागाकूडन त्या सुचनांची अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे. परंतु मागील तीन महिन्यात झालेल्या महासभेतील सुमारे ४० ते ४५ ठराव हे अद्यापही प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पत्रकारांच्या घरांसह, सीसीटीव्ही, आदींसह काही महत्वांच्या प्रस्तावांचा समावेश असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली. या संदर्भात महापौर, सभागृह नेते तसेच विरोधी पक्षनेते यांच्याशी चर्चा केली असता आमच्याकडे कोणतेही ठराव नसून आम्ही सर्वच ठराव मंजुर करुन प्रशासनाकडे पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. परंतु प्रशासन मात्र हे ठराव अद्यापही प्राप्त न झाल्याचे सांगत आहे. त्यामुळे हे मग हे ठराव गेले कुठे असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे ठराव शिल्लक राहिलेले नाहीत. माझी स्वाक्षरी होऊन ते ठराव पुढे गेले आहेत. - (मीनाक्षी शिंदे - महापौर, ठामपा) 

आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे ठराव शिल्लक नाहीत. आम्ही वेळेत ठराव प्रशासनाकडे पाठविले आहेत. - (नरेश म्हस्के - सभागृह नेते - ठामपा) 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त