शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महानगरपालिका पुन्हा ऊर्जा संवर्धनात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 05:49 IST

दोन राज्यस्तरीय पुरस्कार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते गौरव

ठाणे : गेली अनेक वर्षे ऊर्जा संवर्धन, ऊर्जा कार्यक्षमता व अपारंपरिक ऊर्जेचा वापर या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी ठाणे महानगरपालिका राज्यात पुन्हा एकदा अव्वल ठरली आहे. तेराव्या ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन या दोन राज्यस्तरीय सर्वोच्च पुरस्कारांनी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी नागपूर येथील एका कार्यक्रमामध्ये पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर व विद्युत विभागाचे उपनगर अभियंता सुनील पोटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. गेली १३ वर्षे ऊर्जा संवर्धन, कार्यक्षमता या क्षेत्रांत सातत्याने पुरस्कार मिळवणारी ठाणे ही एकमेव महापालिका ठरली आहे. मागील अनेक वर्षांपासून ऊर्जा संवर्धन, व्यवस्थापन, कार्यक्षमता आणि अपारंपरिक ऊर्जेचा वापर या क्षेत्रात महापालिका उल्लेखनीय कामगिरी करत आहे. ठामपाच्या राज्यस्तरीय आणि राष्टÑीय पातळीवरील विविध प्रकल्पांची दखल घेऊन राज्य शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या तेराव्या ऊर्जा संवर्धन तसेच व्यवस्थापनाच्या दोन राज्यस्तरीय सर्वोच्च पुरस्कारांनी महापालिकेला सन्मानित करण्यात आले.विविध प्रकल्पांची घेतली दखलकळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे हाती घेण्यात आलेल्या ऊर्जा संवर्धनाच्या विविध प्रकल्पांची दखल घेऊन ‘सर्टिफिकेट आॅफ मेरिट’ या विशेष पुरस्कारानेही ठामपाचा सन्मान झाला. पालिका प्रशासनाने पथदिव्यांसाठी एलईडी लाइटचा केलेला प्रभावी वापर, महापालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा संवर्धन उपकरणांचा वापर, पालिकेच्या विविध इमारती तसेच शाळांवर सौरऊर्जा प्रकल्प, सार्वजनिकवाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसला चालना तसेच यूएनडीपी प्रकल्पांतर्गत डिस्ट्रिक्ट कूलिंग प्रकल्पासाठी ठामपाची केलेली निवड या बाबींचा विचार करून राज्य शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या वतीने हा सन्मान केल्याची माहिती पालिकेने दिली.