शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
4
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
5
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
6
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
7
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
8
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
9
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
10
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
11
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
12
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
13
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
14
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
15
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
16
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
17
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
18
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
19
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
20
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याची भाजप आणि मनसेची मागणी, स्पर्धेचा निधी पुरग्रस्तांसाठी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 15:53 IST

यंदाच्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या स्पर्धेवर केला जाणारा खर्च पुरग्रस्तांसाठी देण्याची मागणी भाजप आणि मनसेने केली आहे. परंतु या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असल्याने ती रद्द करता येऊ शकत नसल्याचे सत्ताधारी शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देमहापौर मॅरेथान स्पर्धेवर पुन्हा वादाचे सावट७० ते ७५ लाखांचा केला जातो खर्च

ठाणे - महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले असताना दरवर्षी होणारी ठाणेमहापौर वर्षा मॅरेथॉन यंदा रद्द करावी अशी मागणी भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे केली आहे. तर मनसेनेसुध्दा हीच मागणी केली असून मॅरेथॉनचा निधी पुरग्रस्तांच्या कल्याणासाठी देण्याची मागणी केली आहे.              येत्या १८ आॅगस्ट रोजी ३० ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षी खड्डे, प्रयोजकांकडून मिळणाऱ्या रकमेची उधळपट्टी, भर रस्त्यात टाकले जाणारे व्यासपीठ आदींमुळे चर्चेत राहणारी मॅरेथॉन स्पर्धा यंदा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. या स्पर्धेसाठी महापालिकेच्या वतीने ४० लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. इतर खर्च हा प्रयोजकाच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यानुसार या स्पर्धेसाठी एकूण ७० ते ७५ लाखांचा खर्च केला जाणार आहे. परंतु या स्पर्धेवर होणारा हा खर्च पाहता ही रक्कम महाराष्ट्राच्या सांगली, सातारा, कोल्हापूर व कोकण आदी ठिकाणी पुरिस्थतीचा फटका बसलेल्या सर्वसामान्यांच्या हितासाठी देण्याची मागणी भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी केली आहे. एकीकडे पुरस्थिती असतांना दुसरीकडे ही स्पर्धा घेतली तर त्यामुळे महापालिकेच्या विरोधात असंतोष निर्माण होईल असेही त्यांनी या पत्रात नमुद केले आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी सुध्दा या संदर्भात एक पत्र दिले असून ही स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी शहरातील खड्ड्यांची घाई गडबडीत डागडुजी सुरु आहे. पुन्हा तोंडावर असलेल्या गणेशोत्सवात खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुर्दशा होण्याची शक्यता असल्याने मॅरेथॉन रद्द केल्यास प्रशासनाला खड्डे बुजवण्यास योग्य कालावधी मिळेल, असेही पाचंगे यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाBJPभाजपा