शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू

By admin | Updated: July 3, 2017 06:26 IST

‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत ठाणे महापालिकेने गोखले रोडवरील मलवाहिनीची पाहणी करून काम युद्धपातळीवर सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत ठाणे महापालिकेने गोखले रोडवरील मलवाहिनीची पाहणी करून काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. मलवाहिनीच्या खड्ड्याभोवताली फलक लावून अत्याधुनिक यंत्राद्वारे कामाला सुरुवात केली. ‘गोखले रोडवरील मलवाहिनीचे काम खोळंबले’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने २० जून रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते.सतत गर्दी असणाऱ्या गोखले रोडवर मागील तीन महिन्यांपासून मलवाहिनीच्या कामासाठी मोठा खड्डा महापालिकेच्या बांधकाम विभागाने खोदून ठेवला आहे. पावसाळ्यापूर्वी काम होणे अपेक्षित असताही ते अद्यापही झाले नव्हते. त्यापासून रस्त्यावरील वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. यामुळे संतापलेल्या ठाणेकरांनी काम वेळेत का पूर्ण झाले नाही, यासह विविध मुद्यांना हात घालून ठाणे महापालिकेच्या (टीएमसी) बांधकाम विभागाला धारेवर धरले होते. सातत्याने पाठपुरावा करूनही काम न करणाऱ्या ठाणे महापालिकेने ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन तांत्रिक पद्धतीच्या या कामास प्रारंभ केला. या कामाचे महत्त्व पटवून देणारी इत्थंभूत माहिती नागरिकांच्या माहितीसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. कामाच्या वर्कआॅर्डरचा नंबर, किती कालावधीत हे काम पूर्ण होणार, कामाचे नाव, कामाचे स्वरूप, अंदाजे खर्च, कंत्राटदाराचे नाव, कामाच्या सुरुवातीचा दिनांक, या कामास जबाबदार महापालिका अधिकाऱ्याचे, ठेकेदाराचे, कंपनीचे नाव व फोन नंबर, आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी जबाबदार अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक आदी माहिती देणारा फलक महापालिकेने या कामाच्या ठिकाणी लावला आहे. मलवाहिनीच्या भुयारी पाइपलाइनसाठी रस्त्याच्या मधोमध हा खड्डा तीन महिन्यांपासून केला आहे. त्यात पडून दुर्घटना होऊ नये म्हणून चहूबाजूने पत्र्यांचे कम्पाउंड घातले आहे.