कल्याण : मार्च महिन्यापासून ठाणे ते अंबरनाथ या पट्ट्यात ११ फेऱ्या वाढणार आहेत. गर्दीमुळे धावत्या गाडीतून पडून होणाऱ्या मृत्यूंची दखल घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून २१ मार्चच्या आधी या वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत. डीआरयूसीसी (रेल यात्री उपभोक्ता समिती) च्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला.या बैठकीत मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी ठाण्याच्या पुढे ११ फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती दिली. २१ मार्चपूर्वी या फेऱ्या सुरू होणार असून त्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे ओझा यांनी सांगितले.
ठाण्यापुढे मार्चपासून लोकलच्या ११ फेऱ्या
By admin | Updated: February 18, 2016 06:58 IST