शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

Thane: तरुणाचा खून करणाऱ्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा निर्णय

By जितेंद्र कालेकर | Updated: March 21, 2024 21:31 IST

Thane News: मैत्रिणीला आपल्याबद्दल चुकीची माहिती दिल्याचा जाब विचारणाऱ्या बॉबी उर्फ तारसेसमिंग सहोता याचा खून करणाऱ्या शिवम तिवारी, आशिषकुमार उर्फ लल्ला निशाद आणि राहूल उर्फ कंदी यादव या तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठाणे न्यायालयाने गुरुवारी सुनावली.

- जितेंद्र कालेकरठाणे - मैत्रिणीला आपल्याबद्दल चुकीची माहिती दिल्याचा जाब विचारणाऱ्या बॉबी उर्फ तारसेसमिंग सहोता (२३, रा. सावरकरनगर, ठाणे) याचा खून करणाऱ्या शिवम तिवारी, आशिषकुमार उर्फ लल्ला निशाद आणि राहूल उर्फ कंदी यादव या तिघांना जन्मठेपेची तसेच प्रत्येकी दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने गुरुवारी सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षाही आरोपींना भोगावी लागणार आहे.

ठाण्याच्या सावरकरनगर भागात आरोपीसह बॉबी सहोता हे चौघेही मित्र वास्तव्याला होते. बॉबी आणि शिवम तिवारी यांची एक मैत्रिण होती. शिवमने बॉबीबद्दल काहीतरी उलटसुलट माहिती तिला दिली. ही माहिती तिने बॉबीला सांगितली. याचाच जाब बॉबीने शिवमला विचारला. तेंव्हा शिवमने त्याला ६ नोव्हेंबर २०१७ रोजी भेटण्यासाठी सावरकरनगर येथील ज्ञानोदय शाळेजवळ बोलवले. तिथे तिवारी याच्यासह त्याच्या आशिषकुमार आणि राहूल या साथीदारांनी चाकूचे वार करीत बॉबी आणि त्याचा मित्र अजय सिंग याच्या पोटावर गंभीर दुखापत केली. तर अन्य एक मित्र संतोष पांडे यांच्या डाव्या हाताला दुखापत केली. यामध्ये बॉबी याचा मृत्यू झाला होता. तर अजय याच्या खूनाचा प्रयत्न झाला होता.

याच खटल्याची सुनावणी २१ मार्च २०२४ रोजी ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एल. भोसले यांच्या न्यायालयात झाली. यामध्ये सरकारी वकील वर्षा चंदने यांनी १५ साक्षीदार तपासले. सर्व साक्षी पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना खूनाच्या गुन्हयात जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

टॅग्स :Courtन्यायालयthaneठाणे