शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीत ठाणे आघाडीवर

By admin | Updated: November 30, 2015 02:19 IST

या वर्षातील ठाणे लाचलुचपत विभागाने (एसीबी) लावलेल्या १३१ सापळ्यांत १८१ जणांना जेरबंद करण्यात आले असून त्यामध्ये २३ खाजगी व्यक्तींचा समावेश आहे

ठाणे : या वर्षातील ठाणे लाचलुचपत विभागाने (एसीबी) लावलेल्या १३१ सापळ्यांत १८१ जणांना जेरबंद करण्यात आले असून त्यामध्ये २३ खाजगी व्यक्तींचा समावेश आहे. तर इतरांवर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस खात्यातील पोलिसांनाच अटक होणाऱ्या लोकसेवकांमध्ये आघाडी कायम ठेवली आहे. ठाणे परिक्षेत्रातील सहा युनिटमध्ये ठाण्याने आघाडी घेतली आहे. तेथे सर्वाधिक ५६ गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यक्षेत्रात ठाणे शहर-ग्रामीण, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर पालघर हे नवे युनिट तयार करण्यात आले आहे. याचदरम्यान, २०१५ या वर्षात एसीबीकडे आलेल्या तक्रारीवरून शासननिर्मित ३९ विभागांतील १३१ सापळे लावण्यात आले. त्याचमध्ये लोकसेवकांसह खाजगी व्यक्तीही रंगेहाथ पकडल्या गेल्या आहेत.२०१४ या वर्षाप्रमाणेच २०१५ च्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्गात कारवाई केली. त्या वेळी वेंगुर्ला पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकाऱ्याला पक डण्यात आले. २०१५ च्या जानेवारी -२२ नोव्हेंबर या अकरा महिन्यांत एकूण १३१ सापळे लावून १५८ लोकसेवकांना अटक केली. त्या केलेल्या कारवाईत १८ लाखांची सर्वाधिक तर ३० रुपयांची सर्वात कमी लाच मागणाऱ्यांना जेलमध्ये जाण्याची वेळी ओढवली आहे. जानेवारीत ४ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या पनवेल येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला पकडले. तसेच ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तीन पोलिसांना अटक केली. त्यातील एका शिपायाकडे करोडो रुपयांचा ऐवज निदर्शनास आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचबरोबर बदलीसाठी सर्वाधिक १८ लाखांची मागणी करणे ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकासह निरीक्षकाच्या हाती बेड्या पडल्या आहेत. तर जिल्हा परिषद (ग्रामीण) पाणीपुरवठा अधीक्षक अभियंत्यासह कनिष्ठ अभियंत्याला लाचप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यावेळी त्यांच्याकडून १९ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली होती. शासननिर्मित खात्यात काम करणारे लोकसेवक श्रेणीनिहाय पाहिल्यास क्लास वन श्रेणीत २०, क्लास टूमध्ये २६ आणि क्लास थ्रीमध्ये ९५ जणांचा समावेश आहे. अशा घटना या वर्षी जास्त प्रमाणात उघडकीस येणे म्हणजे नागरिकांमध्ये जागृती वाढल्याचे दिसते. तसेच एसीबी विभागाने वेळोवेळी घेतलेल्या मोहिमांचा हा प्रतिसादच असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)