शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, कल्याण, कुर्ला, अंधेरीसह बोरिवली मोबाइलचोरीचे हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:13 IST

मे अखेरपर्यंत दीड हजार मोबाइलची चोरी; पोलिसांची माहिती

- भवानी झा ठाणे : मध्य आणि पश्चिम या रेल्वेमार्गांवरील ठाणे, कल्याण व कुर्ला तसेच अंधेरी आणि बोरिवली या रेल्वेस्थानकांच्या हद्दीत मोबाइलचोरीचे प्रकार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१८ या वर्षभरात अंदाजे चार हजार दोनशे, तर २०१९ च्या मे अखेरपर्यंत सुमारे दीड हजार मोबाइल चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी दिली.दिवसेंदिवस रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत आहे. यामुळे होणाऱ्या गर्दीत मोबाइलचोरीचे प्रकार वाढले आहेत. लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दररोज सरासरी ६५ ते ७० मोबाइलचोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. तसेच पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणाºया चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ८० टक्के गुन्हे हे मोबाइलचोरीचे, तर २० टक्के गुन्हे हे इतर वस्तूंच्या चोरीचे असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. त्यातच, मोबाइलचोरीचे प्रकार प्रामुख्याने गर्दी असणाºया सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते १० या वेळेत घडत आहेत. मोबाइलचोरट्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुष चोरट्यांचे प्रमाण अधिक आहे. २०१८ या वर्षभरात रेल्वेतून मोबाइल चोरणाºया चार हजार १६२, तर २०१९ च्या मे अखेरपर्यंत एक हजार ४५२ चोरटे जेरबंद झाल्याची माहिती लोहमार्ग वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी लोकमतला दिली.प्रवाशांमध्ये जनजागृतीमोबाइलचोरट्यांवर आळा बसण्यासाठी रेल्वे प्रशासनाद्वारे उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवाशांनी मोबाइल व सामानाची काळजी घेण्याबाबत उद्घोषणा केली जाते. रेझिंग डे सप्ताहानिमित्त व रेल्वे प्रवासी संघटनांसोबत बैठकांचे आयोजन करून प्रवासांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येतात.

टॅग्स :localलोकल