शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील आगीच्या घटनांत घट

By admin | Updated: November 24, 2015 01:47 IST

ठाणे महापालिका हद्दीत दिवाळीच्या चार दिवसांत विविध ठिकाणी ३३ आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र झाली आहे.

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत दिवाळीच्या चार दिवसांत विविध ठिकाणी ३३ आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत यंदा आगीच्या ३०२ घटना घडल्या आहेत. मागील वर्षी हेच प्रमाण ३१७ एवढे होते. परंतु, पालिका आणि अग्निशमन विभागाने केलेल्या विविध उपायांमुळे का होईना यंदा आग लागण्याच्या प्रमाणात काही अंशी घट झाली आहे.सहा वर्षांपूर्वी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वर्तकनगर येथील तारांगण सोसायटीमधील पुनर्वसू या इमारत क्रमांक १० मधील १४ व्या मजल्याला लागलेल्या आगीत अग्निशमन विभागाचे सहा जवान शहीद झाले होते. त्यानंतर, ठाणे महापालिका खडबडून जागी झाली होती. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच जनजागृती आणि मॉकड्रीलच्या माध्यमातून अग्निशमन विभागाने ठाणेकरांना जागरूक करण्याचे काम केले आहे.यंदा दिवाळीच्या काळात एखादी आगीची घटना घडली तरी त्यासाठी सात ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात अग्निशमन केंद्र उभारले होते. यंदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १० नोव्हेंबरला शहरात आगीची केवळ एकच घटना घडली. तर, दुसऱ्या दिवशी १६ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या. तिसऱ्या दिवशी ९ आणि चौथ्या दिवशी ५ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीत शहरात आगीच्या ३१७ घटना घडल्या होत्या. तर, यंदा याच कालावधीत ३०२ घटना घडल्या आहेत. यासंदर्भात अग्निशमन विभागाशी संपर्क साधला असता आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाय, जनजागृतीचे कार्यक्रम, मॉकड्रील आणि त्यामध्येही नागरिकांचा सहभाग, याशिवाय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी केले जात असलेले प्रशिक्षण आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यामार्फत वारंवार केले जात असलेले मार्गदर्शन यामुळे शहरात यंदा आगीच्या घटनांवर आळा बसविण्यात यश आल्याचा दावा अग्निशमन विभागाचे प्रमुख अरविंद मांडके यांनी केला आहे.(प्रतिनिधी)