शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात चक्क स्मशानभूमीचीच झाली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 02:03 IST

ओवळा-माजिवडा मतदारसंघात पूर्वी ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या काळात नागरी वस्ती कमी असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात स्मशानभूमीची आवश्यकता भासत नव्हती.

ठाणे : शहरात पूर्वी अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. या स्मशानभूमीच्या जागेवर इमारती उभारण्यास परवानगी कशी काय देण्यात आली, याची चौकशी करून चोरीला गेलेल्या स्मशानभूमींचा शोध महापालिकेने घ्यावा, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.ओवळा-माजिवडा मतदारसंघात पूर्वी ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या काळात नागरी वस्ती कमी असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात स्मशानभूमीची आवश्यकता भासत नव्हती. त्यामुळे लक्ष्मी चिरागनगर परिसरातील नागरिक हे शेठ ग्रुपच्या सद्य:स्थितीत उभ्या असलेल्या वसंत लॉन्स गृहसंकुलाच्या नाल्याशेजारील जागेत अंत्यसंस्कार करत होते. वर्तकनगर, शिवाईनगर, शास्त्रीनगर परिसरातील नागरिक सध्या रस्ता नसलेल्या रामबाग व जुन्या कोंजेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करत होते. उपवन व पोखरण रोड नं. २ परिसरातील नागरिक हे आता उभ्या असलेल्या नीळकंठ गृहसंकुल परिसराच्या जागेत अंत्यसंस्कार करत होते. त्याचबरोबर लोकमान्यनगर परिसरातील नागरिक हे यशोधननगर, देवेंद्र इंडस्ट्रीजसमोरील नाल्यालगत उभ्या असलेल्या इमारतींच्या जागेत अंत्यसंस्कार करत होते. जुना कोकणीपाडा व वसंत विहार परिसरातील नागरिक हे कल्पतरू व नीळकंठ गृहसंकुलांच्या परिसरातील जागेत अंत्यसंस्कार करत होते, असे सरनाईक यांनी सांगितले. येऊर, पाटोणापाडा परिसरातील नागरिक हे खाजगी जागेवर आजही उघड्यावर अंत्यसंस्कार करत आहेत, तर पानखंडा गावात स्मशानभूमी वनखात्याच्या जागेत असल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करत आहेत.पालिकेने शोध घेण्याची केली मागणीओवळा येथील काही नागरिक ब्ल्यू रूफ क्लबशेजारील दिलीप ओवळेकर यांनी बांधलेल्या जागेत अंत्यसंस्कार करत आहेत. भार्इंदरपाडा व आसपासचे नागरिक नागलाबंदरशेजारील मेरीटाइम बोर्डाच्या जागेवर उघड्यावर अंत्यसंस्कार करत आहेत. एकूणच ठाणे शहरात नवनवीन गृहसंकुले उभी राहत असल्याने या भागातील स्मशानभूमी चोरीला गेल्या की काय, असा प्रश्न त्यांनी केला असून गायब झालेल्या व चोरीला गेलेल्या स्मशानभूमीचा महापालिकेने शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणे