शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

ठाणे रुग्णालय प्रशासन ‘त्या’ डॉक्टरांच्या पाठिशी

By admin | Updated: June 24, 2016 03:38 IST

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात अतिरिक्त आयुक्तांनी मंगळवारी अचानक रुग्णालयाची झाडाझडती घेतली असता, विविध विभागातील तब्बल २३ डॉक्टर कामाच्या

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात अतिरिक्त आयुक्तांनी मंगळवारी अचानक रुग्णालयाची झाडाझडती घेतली असता, विविध विभागातील तब्बल २३ डॉक्टर कामाच्या वेळेत हजर नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास होती. त्यानंतर या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, आता रुग्णालय प्रशासन या कामचुकार डॉक्टरांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करीत असून त्यांनी या कारवाईवरच आक्षेप घेतला आहे. दुसरीकडे हे डॉक्टर अद्यापही थम्ब मशिनला संलग्न नसल्याची भूमिका पालिका प्रशासने घेतली असून रुग्णालय प्रशासनाने मात्र या डॉक्टरांची रोज थम्ब मशिनद्वारे हजेरी घेतली जात असल्याचा दावा केला आहे. पालिका आणि रुग्णालय प्रशासनात आता या मुद्यावरुन सावळोगोंधळा निर्माण तर झाला आहेच, परंतु, गलेलठ्ठ पगार घेऊन गैरहजर राहणाऱ्या या डॉक्टरांमुळे रुग्णालयात दूरवरुन येणाऱ्या शेकडो रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. त्यामुळे आता आयुक्त याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयात जिल्ह्याच्या विविध भागातून रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या ही १२०० च्या घरात आहे. तर आंतर रुग्णांची संख्या, ३०० च्या आसपास आहे. रुग्णालय आणि रुग्णालय प्रशासनाची लक्तरे यापूर्वीदेखील वेशीला टांगली गेली आहेत. महासभा अथवा स्थायी समितीची सभा दोनही ठिकाणी सदस्यांनी कळवा रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराचे धिंडवडे काढले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायीच्या बैठकीत तर कळवा रुग्णालयाच्या कारभारावरील चर्चेत या रुग्णालयातच स्थायीची बैठक घ्या, अशी मागणीच काही सदस्यांनी केली होती. असे असतांनाहीदेखील रुग्णालय प्रशासन आजही यातून काही बोध घेतांना दिसत नाही. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य आणि वेळेत उपचार मिळावेत म्हणून डॉक्टरांची फळी उभारण्यात आली आहे. परंतु असे असतांनाही देखील तज्ज्ञ डॉक्टरांऐवजी प्रशिक्षिणार्थी डॉक्टरांकडूनच रुग्णावर उपचार केले जात असल्याची माहिती आता या निमित्ताने समोर आली आहे.