शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Thane: कळव्यातील गुंडावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्दतेची कारवाई, येरवडा कारागृहात रवानगी

By जितेंद्र कालेकर | Updated: March 24, 2023 19:54 IST

Thane: कळवा परिसरात महिलेचा विनयभंग, हाणामारी, ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि धमकावणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या जयप्रकाश प्रल्हाद बिंद या कुप्रसिद्ध गुंडावर स्थानबद्दतेची कारवाई केली आहे.

ठाणे  - कळवा परिसरात महिलेचा विनयभंग, हाणामारी, ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि धमकावणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या जयप्रकाश प्रल्हाद बिंद (४०, रा. कळवा, ठाणे) या कुप्रसिद्ध गुंडावर ठाण्याचे सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्दतेची कारवाई केली आहे. त्याची पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी दिली.

कळव्यातील गुंड जयप्रकाश याच्यावर विनयभंगासह शिवीगाळ करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे आणि धमकी देणे असे सहा गंभीर गुन्हे दाखल झाले होते. याच पार्श्वभूमीवर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी त्याच्या स्थानबद्दतेसाठी एमपीडीए अंतर्गत त्याच्यावर कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. याची पडताळणी करुन सह आयुक्त कराळे आणि अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्याखाली २३ मार्च २०२३ रोजी स्थानबद्दतेची कारवाई करुन त्याला पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षांसाठी रवानगी केली आहे.

 वर्षभरात २६ जणांवर स्थानबद्दतेची कारवाई-ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंग यांनी दहशत निर्माण करणाºया तसेच सक्रीय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २०२२ मध्ये २२ तसेच २०२३ मध्ये आतापर्यंत चार सराईत आणि अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याखाली कारवाई केली आहे. यापुढेही एमपीडीए अंतर्गत स्थानबद्दतेची कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी िदली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे