शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Thane: ८ महिन्यात पूर्ण होणारे गांधीनगर पूलाचे काम सहा वर्षे रखडले, अपूर्ण कामामुळे पोखरण रोडवर वाहतूक कोंडी

By अजित मांडके | Updated: February 6, 2023 12:35 IST

Thane News: गेल्या वर्षभरापासून ठाण्यातील विकास कामांना वेग आला असला तरी गांधीनगर पूलाचे काम ८ महिन्यात पूर्ण होणारे मात्र तब्बल सहा वर्ष रखडल्याचे समोर आले आहे.

- अजित मांडकेठाणे  : गेल्या वर्षभरापासून ठाण्यातील विकास कामांना वेग आला असला तरी गांधीनगर पूलाचे काम ८ महिन्यात पूर्ण होणारे मात्र तब्बल सहा वर्ष रखडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे काम अपूर्ण असून सुद्धा पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदाराला कोट्यवधीची बिलही काढण्यात आली आहे. या कामासाठी पालिका अधिकारी मात्र ठेकेदाराला कशी मुदतवाढ देता येईल यामध्ये व्यस्त आहे.

ठाण्यातील पोखरण रोड येथे २०१६ साली रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर येथील मुख्य रस्त्याची रूंदी वाढविण्यात आली. उपवन ते माजिवडा येथील रस्ता ४० मीटर रूंदीचा करण्यात आला आणि या रस्त्याच्या रूंदीकरणासोबत २०१७ ला गांधीनगर येथील पुलाची रूंदी वाढवण्याचे कामही ठाणे महापालिकेने हाती घेतले. ह्या पूलाच्या बांधकामाचे काम अजय पाल मंगल आणि कंपनी या ठेकेदाराला देण्यात आले. साधारण ६ कोटींचे हे काम मंजूर करण्यात आले होते. पण ८ महिन्यात पूर्ण करायचे काम  सहा वर्षे रखडल्यामुळे पोखरण रोड २ वर नेहमीच नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे . सकाळी आणि सायंकाळी वर्दळीच्या वेळी तासं-तासं लोकांना वाहतूक कोंडीमध्ये अडकून रहावे लागत आहे. केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका ठाणेकरांना सहन करावा लागत आहे असा आरोप मनसेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे.

ठाणे महापालिकेने २०१७ रोजी ठेकेदाराला काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असूनही ८ महिन्यात पूर्ण होणारे काम गेली सहा वर्षे कागदावरच आहे. मात्र तरीही याबाबत पालिका ठेकेदाराविरोधात कोणतीच कारवाई करत नाही. काम अपूर्ण असूनही पालिकेने मात्र आतापर्यंत या ठेकेदाराला सुमारे ५ कोटींपर्यंत इतकी रक्कमेची देयक मंजूर केले आहेत व त्यातील  बहुतेक रक्कम देण्यात देखील आली आहे.ह्या पूलाचे काम अपूर्ण राहण्याला ठाणे महापालिकाच जबाबदार आहे. आठ महिन्यात पूर्ण होणाऱ्या पूलाचे काम सहा वर्षे रखडले तरी पालिका याबाबत कोणतीच कारवाई करत नसल्याचे समोर आले आहे. पूलाचे काम त्वरीत पूर्ण न केल्यास मनसेच्या वतीने संबंधित पालिकेच्या अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करत आंदोलन करण्यात येईल.स्वप्निल महिंद्रकर, शहर अध्यक्ष, मनसेचे जनहित व विधी विभाग

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी