शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

ठाणे एफडीएची धडक कारवाई, लाखो किलो खजूर अन् जिरा जप्त

By अजित मांडके | Updated: November 15, 2022 15:03 IST

एकूण १३ अन्नपदार्थांचे नमुने घेत, ते तपासणी पाठवले आहेत.त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे ठाणे एफडीएने सांगितले.

ठाणे :  गैरछापाचा व कमी प्रतीचा अन्नपदार्थ असल्याच्या संशयासह अस्वच्छ व अनारोग्य वातावरणात साठवलेला लाखो किलो खजूर आणि हजारो किलो जिरा यांसारख्या अन्नपदार्थाचा एक कोटी ७ लाख रुपयांचा साठा ठाणेअन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) जप्त केला आहे. ही कारवाई १४ नोव्हेंबर रोजी नवी मुंबई येथील खैरणे येथे केली असून यावेळी एकूण १३ अन्नपदार्थांचे नमुने घेत, ते तपासणी पाठवले आहेत.त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे ठाणे एफडीएने सांगितले.         नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्न पदार्थांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्व सामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अन्नपदार्थांचे उत्पादक, साठवणूकदार तसेच शीतगृहे यांच्या तपासणीची विशेष मोहीम ठाणे एफडीएने हाती घेतली आहे. या करवाईपुर्वी म्हणजे २ नोव्हेंबर २०२२ रोजी नवीमुंबई, तुर्भे येथील एमआयडीसीमधील मेसर्स सावला फूड अँड कोल्ड स्टोरेज प्रायव्हेट लिमिटेड, व मेसर्स सावला फुड्स अँड कोल्ड स्टोरेज प्रायव्हेट लिमिटेड,या ठिकाणी असलेल्या शीतगृहाची तपासणी करून रुपये २९ कोटी ६७ लाख ७१ हजार ११० किमतीचा विविध अन्नपदार्थाचा साठा केला. दरम्यान तेथे शीतगृहात आढळून आलेल्या त्रुटी इतर शीतगृहात राहू नयेत किंवा आढळून येऊ नयेत म्हणून कोकण विभागातील ८७ शीतगृहांना ८ नोव्हेंबर २०२२ रोजी नोटीस पाठवून त्यांना अन्नपदार्थाचे साठवणूक करताना नक्की काय खबरदारी घ्यावी याबाबत स्पष्टपणे सूचना केल्या होत्या. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी नवीमुंबई, खैरणे, एमआयडीसी येथील मेसर्स पी.एम. कोल्ड स्टोरेज येथे शीतगृहाची तपासणी केली असता, येथील शीतगृहातून १ लाख ३४ हजार ७३३ किलो विविध प्रकारचे खजूर तसेच २ हजार ८४८ किलो जीर असा एकूण १ कोटी ०७ लाख ०३ हजार २५० किमतीचा अन्नपदार्थाचा साठा हा गैरछापाचा व कमी प्रतीचा असल्याचा संशयासह अस्वच्छ व अनारोग्य वातावरणात अशापद्धतीने साठवलेला असल्याने समोर आले. त्याच्यानंतर तो साठा जप्त करण्यात आला. यावेळी त्या अन्न आस्थापनातून एकूण १३ अन्नपदार्थांचे नमुने अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत शासकीय विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या असून त्यांचा अहवाल आल्यानंतर त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे एफडीएने सांगितले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे कोकण विभाग, सह आयुक्त ( अन्न) सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अन्न सुरक्षा अधिकारी राहुल ताकाटे, राम मुंडे, अरविंद खडके, प्रशांत पवार व दीप्ती राजे हरदास यांनी केली.         दरम्यान, नागरिकांना सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्यासह अन्नविषबाधे सारखी अप्रिय घटना घडू नये तसेच शीतगृहात अन्नपदार्थाची योग्य प्रकारे आरोग्यदायी वातावरणात साठवणूक होते किंवा कसे यासह त्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसी ते नमूद बाबीसह त्यांच्याकडून अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ व त्यानंतर या अंतर्गत जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून तरतुदींचे पालन होते किंवा कसे याची पाहणी व तपासणी करण्याकरता प्रशासनामार्फत अशा प्रकारच्या कारवाई यापुढे नियमितपणे घेण्यात येणार असल्याचे एफडीएचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेFDAएफडीएFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग