शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्या मंदिर शाळेतील विज्ञान प्रकल्पाची चायनावारी, आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 14:03 IST

ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्या मंदिर शाळेतील विज्ञान प्रकल्पाची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देडॉ. बेडेकर विद्या मंदिर शाळेतील विज्ञान प्रकल्पाची चायनावारीप्रकल्पाची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवडप्रज्ञा मोरे व सेजल रांगळे या विद्याथीर्नींनी या विषयाचा संशोधनात्मक केला अभ्यास

ठाणे : चायना मकाऊ येथे होणाऱ्या ३४ व्या ‘किशोरवयीन विज्ञान व तंत्रज्ञान नवपरिवर्तन’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाºया विज्ञान स्पर्धेसाठी ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्यामंदिर या शाळेच्या विज्ञान प्रकल्पाची निवड झाली आहे. ‘अ‍ॅनेमिया आजारावर नियंत्रण’ हा या प्रकल्पाचा विषय असून २१ जुलै ते २६ जुलै दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.       प्रज्ञा मोरे व सेजल रांगळे या विद्याथीर्नींनी या विषयाचा संशोधनात्मक अभ्यास केला आहे. या प्रकल्पास शिक्षीका उज्ज्वला धोत्रे व अभिजीत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शुक्रवार १९ जुलै रोजी रात्री ११ वाजता शिक्षिका धोत्रे व विद्यार्थीनी प्रज्ञा हे चायनाला रवाना होत आहे. या विद्याथीर्नींनी केलेल्या अभ्यासात असे आढळले की, भारतात तसेच, संपूर्ण जगात लहान मुले, स्त्रिया, गरोदर स्त्रिया यांच्यात अ‍ॅनिमियाचे प्रमाण जास्त असते. त्यावर गोळ््या, कॅप्सुल्स, इंजेक्शन या स्वरुपात औषधे उपलब्ध आहेत. तसेच, काही अन्नघटकातूनसुद्धा लोह शरिरास पुरवले जाते. परंतू काही अन्न - पदार्थांची अ‍ॅलर्जी, खर्चिक बाब यांमुळे लोक दुर्लक्ष करतात व अ‍ॅनिमियाचे प्रमाण वाढते. विद्याथीर्नींच्या संशोधनातून अशी माहिती मिळाली की, स्पिरुलीना अ‍ॅलजीमध्ये लोह व प्रथिनांची मात्र जास्त प्रमाणात आहे. परंतू रंग, वास, चव यांमुळे ती प्रत्यक्ष खाल्ली जात नाही म्हणून विद्याथीर्नींनी सर्व वयोगटाला आवडेल असे स्पीरुलीना मिश्रीत चॉक्लेट्स तयार केले. त्याची तपासणी एन्व्हायरोकेअर लॅबमध्ये केली असता लोह व इतर पोषक मूल्याचे प्रमाण अधिक आढळले असे शाळेच्यावतीने सांगण्यात आले. भारताचे प्रतिनिधीत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करणाºया दोन विज्ञान प्रकल्पांमध्ये आमच्या मराठी माध्यमाच्या एका विज्ञान प्रकल्पाचा सहभाग आहे. याचा मुख्याध्यापक म्हणून मला अभिमान आहे अशा भावना शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पांचाळ यांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :thaneठाणेscienceविज्ञानchinaचीन