शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात चार तालुके वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 06:29 IST

जिल्ह्याचे विभाजन होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यापाठोपाठ आता डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी पूर्व या चार नवीन तालुक्यांची लवकरच निर्मित होणार आहे. त्यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत.

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्याचे विभाजन होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यापाठोपाठ आता डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी पूर्व या चार नवीन तालुक्यांची लवकरच निर्मित होणार आहे. त्यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत.ठाण्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यामुळे ठाणे जिल्ह्यात सात तालुके शिल्लक आहेत. त्यात आता या चार तालुक्यांची भर पडून ते ११ होणार आहेत. महसूलच्या विविध कामांसाठी नागरिकांची होत असलेली फरफट, वाढती लोकसंख्या आणि त्याचा प्रशासनावर पडत असलेला ताण आदी समस्या कमी होण्याची शक्यता आहे. या पावसाळी अधिवेशनानंतर चारही तालुक्यांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.ठाणे तालुक्याचे विभाजन होऊन नवी मुंबईला तालुक्याचा दर्जा मिळेल. ठाण्यात समाविष्ट असलेल्या मीरा-भार्इंदरलादेखील तालुक्याचा दर्जा देऊन मीरा रोड येथे तहसीलदार कार्यालय उभारले जाणार आहे. कल्याण तालुक्याचे विभाजन होऊन डोंबिवली, तर भिवंडी तालुक्यातून भिवंडी पूर्व तालुक्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे.प्रत्येक तालुक्यासाठी तहसीलदार व अतिरिक्त तहसीलदार असे दोन अधिकारी असणार आहेत. त्यांच्या कार्यालयांसाठी लागणाºया अन्य कर्मचारी वर्गाचेदेखील नियोजन जवळजवळ निश्चित झाले आहे. या चार शहरी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महसूल असल्यामुळे त्यांची वसुली या स्वतंत्र तहसीलदार कार्यालयांकडून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.नवी मुंबईतून वगळलेली १४ गावे सध्या कल्याण तालुक्यात आहेत. ती ठाणे तालुक्यात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. डोंबिवली या शहरी तालुक्यासदेखील २७ गावांमधील काही गावे जोडण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. यासह ठाण्याची २२ गावे मिळून होणाºया ६३ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेला खीळ बसणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.भिवंडी गोदामांचा ग्रामीण तालुका कायमभिवंडी तालुक्यातील ६० ग्रामपंचायत क्षेत्रात २५ हजार गोदामे आहेत. त्याचा ग्रामीण तालुका कायम राहणार आहे. नव्याने निर्माण होणाºया शहरी तालुक्यात भिवंडी-निजामपूर मनपा क्षेत्र १३ गावे, एमएमआरडीए क्षेत्रातील ५१ गावांमधील काही भागांचा समावेश करण्याची शक्यता आहे.मीरा-भार्इंदरच्या शेतकºयांना सुमारे ३० किमी अंतर कापून ठाणे गाठावे लागते. या शहरात उत्तन परिसर पर्यटन क्षेत्र आहे.