शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात ६६ उमेदवार निवडणूक रिंगणात- दुरंगी लढतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 18:51 IST

जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी ८७ उमेदवारांनी ११४ नामनिर्देशनपत्र (अर्ज) दाखल केले होते. छाननीमध्ये १२ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. शिल्लक राहिलेल्या ७५ उमेदवारांपैकी नऊ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी शुक्रवारी मागे घेतली. यामुळे आता ६६ उमेदवार जिल्ह्यातील निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

ठळक मुद्देबंडखोर उमेदवारांनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमधील दुरंगी लढतीचा मार्ग मोकळाभिवंडीच्या मतदान केंद्रांमध्ये केवळ एक मतदान यंत्र

ठाणे : जिल्ह्यातील लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघातून नऊ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी आज मागे घेतली आहे. यामुळे या तिन्ही मतदारसंघात आता केवळ ६६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ठिकठिकाणच्या बंडखोर उमेदवारांनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता या तिन्ही मतदारसंघांमधील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमधील दुरंगी लढतीचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी ८७ उमेदवारांनी ११४ नामनिर्देशनपत्र (अर्ज) दाखल केले होते. छाननीमध्ये १२ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. शिल्लक राहिलेल्या ७५ उमेदवारांपैकी नऊ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी शुक्रवारी मागे घेतली. यामुळे आता ६६ उमेदवार जिल्ह्यातील निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. या उमेदवारांना होणा-या मतदानासाठी ठाणे व कल्याण मतदारसंघामधील मतदार केंद्रांवर दोन बॅलेड युनिट म्हणजे मतदानयंत्र लागणार आहेत. तर भिवंडीच्या मतदान केंद्रांमध्ये केवळ एक मतदान यंत्र उपलब्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.ठाणे मतदार संघात आता २५ पैकी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दोघांनी उमेदवारी मागे घेतली. यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये आता दुरंगी लढत होणार आहे. या दोन प्रमुख उमेदवारांसह या मतदारसंघात आता नोंदणीकृत अमान्य पक्षांच्या १३ उमेदवारांसह दहा अपक्ष उमेदवार ठाणे मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात ३६ उमेदवार होते. यातून चार अवैध ठरले होते. शिल्लक राहिलेल्या ३२ उमेदवारांपैकी चार जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामतदार संघातही शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांमध्ये लढत होईल. भिवंडी मतदार संघात तिरंगी लढत होणार होती. पण शिवसेनेच्या व काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराने देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळे या मतदार संघात आता भाजपा व काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये दुरंगी लढतीचा मार्ग मोकळा झाला. भिवंडीत शिल्लक राहिलेल्या १८ उमेदवारांपैकी तीन जणांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे या मतदारसंघात आता १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

टॅग्स :thaneठाणेlok sabhaलोकसभा