शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ठाणे जिल्ह्यात मत मोजणीच्या सर्वाधिक ३४ फेऱ्या मुरबाडला; सर्वात कमी २० फेऱ्या उल्हासनगरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 20:17 IST

या मतमोजणीसाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर एक केंद्रीय निरीक्षक असून जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांवरील १८ केंद्रीय निरीक्षकांच्या नियंत्रणात मतमोजणी होणार आहेत. नऊ हजार पोलिस बंदोबस्तासह ११ एसआरपीएफ व सीआरपीएफच्या तुकड्या या मतमोजणी केंद्रांवर आहेत. मतमोजणी केंद्रावर अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात २१२ उमेदवार३० लाख ६२ हजार ५४४ मतदारांनी (४७.९१ टक्के) २१२ उमेदवारांना मतदान केलेविजयी उमेदवार दुपारी २ वाजे आत निश्चित होण्याची शक्यता एका राऊंडला जास्तीत जास्त अर्धा तास

ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदारांपैकी ३० लाख ६२ हजार ५४४ मतदारांनी (४७.९१ टक्के) २१२ उमेदवारांना मतदान केले आहे. ठिकठिकाणच्या १८ मतमोजणी केंद्रांवर ही मतमोजणी २४ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरू होईल. एक राऊंड पूर्ण होण्यासाठी तब्बल अर्धा तास लागणार आहे. यानुसार सर्वाधिक मुरबाड येथील मतमोजणी ३४ फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे. तर उल्हासनगरला सर्वात कमी म्हणजे २० फेऱ्यांमध्येही मतमोजणी होणार आहे.         जिल्ह्यातील ३० लाख ६२ हजार ५४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १७ लाख ३२ हजार ९१२ पुरूषांसह १३ लाख २९ हजार ४८७ महिला आणि १४५ इतर मतदारांनी मतदान केले आहे. या २१२ उमेदवारांपैकी विजयी उमेदवार  दुपारी २ वाजेच्या आत निश्चित होण्याची शक्यता आहे. मतदारसंघात झालेले एकूण मतदान, तेथील उमेदवार, एकूण ईव्हीएम आदींचा विचार करता एका राऊंडला जास्तीत जास्त अर्धा तास लागणार आहे. १८ विधानसभाच्या मतमोजणीपैकी सर्वात जास्त ३४ फेऱ्यामध्ये मुरबाड मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे.यानुसार अन्यही १६ मतदारसंघात मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. तर उल्हासनगर मतदारसंघात सर्वात कमी २० फेऱ्यामध्ये मतमोजणी पूर्ण होणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.        जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी १८ मतमोजणी केंद्रावर होणार आहे. या प्रत्येक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात आले आहे. त्यावर १२० कर्मचारी आहेत. यानुसार जिल्ह्यात एक हजार २०० कर्मचारी या १८ मतदान केंद्रांवर तैनात आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्याव्दारे अत्यंत पारदर्शीपणाने व अचूकतेने मतमोजणी करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, दुसरी फेरीची मतमोजणी सुरू करण्याचे नियोजन आहे. सर्व प्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणार आहेत.

        या मतमोजणीसाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर एक केंद्रीय निरीक्षक असून जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांवरील १८ केंद्रीय निरीक्षकांच्या नियंत्रणात मतमोजणी होणार आहेत. नऊ हजार पोलिस बंदोबस्तासह ११ एसआरपीएफ व सीआरपीएफच्या तुकड्या या मतमोजणी केंद्रांवर आहेत. मतमोजणी केंद्रावर अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे आहे.