शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात २०२७ बालके कुपोषणाच्या चक्रव्यूहात

By admin | Updated: August 30, 2015 23:25 IST

सर्वाधिक महापालिकांचा जिल्हा म्हणून देशात नावारूपाला आलेल्या ठाणे जिल्ह्यात दोन हजार २७ बालके कुपोषणाच्या चक्रव्यूहात अडकली आहेत. संबंधित प्रशासन

सुरेश लोखंडे, ठाणेसर्वाधिक महापालिकांचा जिल्हा म्हणून देशात नावारूपाला आलेल्या ठाणे जिल्ह्यात दोन हजार २७ बालके कुपोषणाच्या चक्रव्यूहात अडकली आहेत. संबंधित प्रशासन यावर उपायांचा दावा करीत असले तरी तो फोल ठरला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी ६० लाख दहा हजार असून त्यापैकी सर्वाधिक शहरी भागात वास्तव्याला आहेत. महापालिकांचे क्षेत्र चोहोबाजूने विस्तारलेले असतानाही या जिल्ह्यात अद्यापही दोन हजार पेक्षा जास्त बालके कुपोषित जीवन जगत आहे. जिल्ह्यातील ठाणे हा संपूर्ण शहरी लोकवस्तीचा तालुका असतानाही त्यात २० बालके कुपोषित आहेत. यानंतर कल्याण तालुकाही बहुतांशी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट असताना त्यामध्येही १३९ बालके कुपोषित आढळली आहेत. महापालिका क्षेत्रालगतही परिस्थिती असून नगरपालिका, नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातही कुपोषित बालके जीव मुठीत घेऊन जगत आहेत. ही स्थिती भूषणावह नाही.विकासाच्या जोरावर नगर पंचायत म्हणून उदयाला आलेल्या शहापूर, भिवंडी व मुरबाड या दोन्ही तालुक्यात तर सर्वाधिक बालके तीव्र कुपोषीत आहेत. शहापूर तालुक्यात ३० हजार ७२० बालकांचे आरोग्य संवंर्धक पध्दतीने वजन केले असता त्यामध्ये तीव्र कमी वजनाची म्हणजे कुपोषित एक हजार ७९ बालके आढळले आहेत. वजन केलेल्यांपैकी ७ टक्के बालकेही कुपोषीत आहेत.महापालिका असलेल्या भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या भिवंडी तालुक्यातील ४० हजार ९८५ बालकांचे वजन केले असता त्यात ७४४ बालके कुपोषित असल्याचे उघड झाले आहे. मुरबाड या नगरपंचायतीच्या विकसित शहरालगतच्या ग्रामीण दुर्गम भागात २७८ बालके कुपोषित आहेत सुदृढ बालकांच्या संख्येपैकी तीन टक्के बालके कुपोषीत आहेत. हे वास्तव असताना प्रशासन कुपोषणाचा बिमोड करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचा दावा महिला- बाल विकास विभागासह आरोग्य विभाग करीत असून तो यामुळे फोल ठरला आहे.