शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात १,३४० कर्जबुडवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 02:11 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर : तीन हजार ३१९ कोटींची कर्जे बुडवल्याचा अंदाज

ठाणे : खोटीनाटी कारणे सांगत, चुकीची किंवा फसवी कागदपत्रे जोडून ठाणे जिल्ह्यातील एक हजार ३४० जणांनी वेगवेगळ्या बँकांतून तीन हजार ३१६ कोटी ७९ लाख ७४ हजार ९२१ रुपयांचे कर्ज बुडवल्याची माहिती हाती आली आहे. सध्या या कर्जबुडव्यांवर गुप्त पाळत असून ते ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या रडारवर आहेत. कोणत्याही क्षणी त्यांची मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.राष्टÑीयीकृत बँका, नागरी सहकारी बँका आणि सहकार क्षेत्रातील सुमारे ५० बँकांनी कर्जे देताना पुरेशी काळजी न घेतल्याने त्यांना हा गंडा घालण्यात आला आहे. केंद्र सरकारने ‘इकॉनॉमिक आॅॅफेन्डर्स बिल २०१८’ ला अनुसरून शनिवारी वटहुकूम जारी केला. त्याद्वारे कर्जबुडव्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला. यामुळे या १,३४० कर्जबुडव्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.ज्यांनी आतापर्यंत मुद्दल किंवा व्याजही भरलेले नाही, अशा १,३४० जणांवर कारवाई होणार असल्याच्या वृत्तास नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी दुजोरा दिला. शिवाय, कोणत्याही प्रकारची शहानिशा, खात्री न करता, कागदपत्रांची सत्यता न पडताळता मनमानी पद्धतीने कर्जवाटप करणाºया संबंधित बँकांच्या मॅनेजरवरही कारवाईचे संकेत त्यांनी दिले. यात उद्योगपती, राजकीय नेते, कारखानदार, लघुउद्योजक, विकासक आदींसह टॅक्सी, रिक्षाचालक, टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या बसेस, मालवाहू टेम्पो, ट्रक यासाठी घेतलेले कर्ज, गृहकर्ज, भागभांडवलदार आदींचा समावेश आहे.८५० जणांनी केली कर्जफेडसुरुवातीला २,५०० कर्जबुडवे होते, पण कारवाईचा फास आवळला जाणार असल्याचे लक्षात येताच, त्यातील ८५० जणांनी काही दिवसांत कर्जफेड केली, तर काहींच्या वसुलीचे काम सुरू आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी