शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात काँग्रेससह राष्ट्रवादी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:53 IST

ठाणे : ठाणे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेस- राष्ट्रवादीने सपाटून मार ...

ठाणे : ठाणे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेस- राष्ट्रवादीने सपाटून मार खाल्ला आहे. दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी या मिनी विधानसभा असलेल्या या निवडणुकीकडे दुर्लक्ष केल्याने पक्षांना त्याची किंमत मोजावी लागली आहे. आता येत्या काळात कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई या महापालिका, अंबरनाथ-बदलापूर या नगरपालिका आणि मुरबाड- शहापूर या नगरपंचायतींच्या निवडणुका येऊ घातल्या असून, शिवसेना- भाजपने त्यासाठी जशी मोर्चेबांधणी केली, त्या प्रकारे ग्रामपंचायत निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही या दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी शहाणपण न घेतल्याने जिल्ह्यात हे दोन्ही पक्ष वाऱ्यावर सोडल्याची चर्चा आहे.

ठाणे जिल्ह्यात विधानसभेचे १८ मतदारसंघ असून, लोकसभेचे तीन मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात शिवसेना- भाजपचे वर्चस्व आहे. महाविकास आघाडीमुळे भाजपा अनेक शहरांच्या सत्तेतून बाहेर असली तरी आमदार- खासदारांच्या संख्येमुळे पक्षाची ताकद कमी झालेली नाही. त्या उलट महाविकास आघाडीत शिवसेना सहभागी झाल्याने राष्ट्रवादीसह काँग्रेसला अनेक ठिकाणी खारीचा का होईना सत्तेत वाटा मिळाला आहे. मात्र, श्रेष्ठींच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात दोन्ही पक्षांची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. काँग्रेसची ताकद आधीच तोळामासा आहे. भिवंडी महापालिकेत झटका बसल्यानंतरही या पक्षाने बाेध घेतलेला नाही. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ज्याप्रमाणे शिवसेना- भाजपाने यश मिळविले त्याप्रमाणे काँग्रेसह राष्ट्रवादीला ते मिळविता आलेले नाही. राष्ट्रवादीला १५८ पैकी अवघ्या ९ ते १० ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे. त्यातही स्वत:ला दिग्गज समजणाऱ्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरेंसह अजित पवार यांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदूराव, महिला अध्यक्षा विद्या वेखंडे, अविनाश थोरात यांच्या शहापूर-मुरबाड या तालुक्यांत राष्ट्रवादीने सपाटून मार खाल्ला आहे. विशेष म्हणजे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पाहिजे तशी रसद पुरवूनही ती तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत न पोहोचल्याने राष्ट्रवादीने मार खाल्ला आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या आवडत्या चेरपोलीसारख्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीतही पक्षाच्या नाकीनाऊ आले आहेत.

आता शहापूर- मुरबाड या नगरपंचायतींसह अंबरनाथ- बदलापूर नगरपालिका, कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई या महापालिकांची निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र, कसदार आणि जाणकार नेतृत्वाअभावी केवळ कागदी घोडे नाचविणाऱ्या नेत्यांमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत वासलात लागल्याने आता काँग्रेस- राष्ट्रवादीचे श्रेष्ठी महापालिका, नगरपालिका अन्‌ नगरपंचायतींच्या निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.