शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बेमुदत संपामुळे ठाणे जिल्हाधिकारी - तहसीलदार कार्यालयात शुकशुकाट, नागरिकांचे मात्र हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 20:01 IST

जिल्हाभर कार्यरत असलेले प्रमोटेड नायब तहसीलदार, अव्वल कारकाून, लिपीक, कोतवाल आणि सिपाई आदी जिल्हाभरातील सुमारे ७२१ कर्मचाऱ्यांनी आजपासून सुरू झालेल्या या बेमुदत संपात सहभाग घेतला. राज्यभरातील सुमारे २० हजार कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी होऊन राज्य शासनाच्या मनमानी विरोधात आंदोलन

ठळक मुद्देराज्यभरातील सुमारे २० हजार कर्मचारी या बेमुदत संपातजिल्हाभरातील सुमारे ७२१ कर्मचारी या बेमुदत संपातअव्वल कारकूनच्या वेतन श्रेणीमधील त्रृटी दूर करा

ठाणे : येथील जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय आणि तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरूवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. यामुळे या कार्यालयांमध्ये आज शुकशुकाट होता. तर कामानिमित्त आलेल्या नागरिकांचे मात्र कोणतेही काम न झाल्यामुळे त्यांना रिकाम्या हाती या कार्यालयांमधून परतावे लागले. यामुळे त्यांच्यात प्रशासनविरोधात तीव्र नाराजी ऐकायला मिळाली आहे.            जिल्हाभर कार्यरत असलेले प्रमोटेड नायब तहसीलदार, अव्वल कारकाून, लिपीक, कोतवाल आणि सिपाई आदी जिल्हाभरातील सुमारे ७२१ कर्मचाऱ्यांनी आजपासून सुरू झालेल्या या बेमुदत संपात सहभाग घेतला. राज्यभरातील सुमारे २० हजार कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी होऊन राज्य शासनाच्या मनमानी विरोधात आंदोलन करीत असल्याचे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे मुख्य सल्लागार भास्कर गव्हाळे यांनी लोकमतला सांगितले. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यासाठी या कर्मचाºयांनी सदनशीर मार्गाने विविध स्वरूपांचे आंदोलने केली. तरी देखील त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यात आले नाही. बुधवारी मंत्रालयात अपर मुख्यसचिवांकडे झालेल्या बैठकीतही मागण्या मंजूर न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.          महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत वाघचौडे, गव्हाळे यांच्यासह रूषिकेश कुलकर्णी, प्रकाश बनसोडे,गिरीष काळे, प्राची चाचड, विजय सकपाळ, कांचन शिरभाते आणि राजू पाटील आदीपदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सुमारे ७२१ कर्मचाऱ्यांनी या बेमुदत संपात सहभाग घेतला. या संपाव्दारे कर्मचाऱ्यांनी राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा दिलेल्या नायब तहसीलदारांना ग्रेड पे मात्र वर्ग तीनचा दिला जातो, हा अन्याय त्वरीत दूर करण्याची मागणी लावून धरली आहे.         याशिवाय ग्रेडपे चार हजार ६०० रूपये करण्यात यावा. लिपिकाचे नाव बदलून महसूल सहाय्यक असे नामकरण करावे, नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाणे ३३ टक्के ऐवजी २० टक्के करा, अव्वल कारकूनच्या वेतन श्रेणीमधील त्रृटी दूर करा, दांगट समितीनुसार पदे मंजूर करा, इतर विभागांच्या कामांसाठी नव्याने आकृती बंध तयार करा आदी १८ प्रकारच्या प्रलंबित मागण्यांसाठी महसूल विभागाच्या या कर्मचाºयांनी बेमुदत संप करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. 

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी