शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हाधिकारी थोडक्यात बचावले

By admin | Updated: April 9, 2017 02:31 IST

बेकायदा रेतीउपसा करणाऱ्या रेतीमाफियांविरोधात तीन दिवसांपासून धडाकेबाज कारवाई करणारे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, तहसीलदार किरण सुरवसे आणि अन्य २० कर्मचाऱ्यांचे

कल्याण : बेकायदा रेतीउपसा करणाऱ्या रेतीमाफियांविरोधात तीन दिवसांपासून धडाकेबाज कारवाई करणारे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, तहसीलदार किरण सुरवसे आणि अन्य २० कर्मचाऱ्यांचे पथक कल्याण येथून शनिवारी दुपारी बोटीने डोंबिवली खाडीकिनाऱ्याची पाहणी करण्यासाठी निघाले असताना त्यांची बोट डोंबिवली रेतीबंदर येथे अचानक पाण्यात बुडू लागली. या घटनेची माहिती अग्निशमन दलास तातडीने कळवल्याने त्यांनी तेथे धाव घेऊन त्यांना वाचवले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह सगळ्यांचे प्राण वाचले आहेत. डॉ. कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांपासून कल्याण रेतीबंदरात मोठी कारवाई करण्यात आली. त्यात रेती, रेतीउपसा करणारी यंत्रसामग्री असा ७२ कोटींचा माल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या बोटी, सक्शन पंप आदी गॅसकटरने तोडण्यात आले. तसेच महापालिकेच्या मदतीने जेटीही उद्ध्वस्त करण्यात आल्या. यामुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहेत. कल्याण-डोंबिवलीच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण खाडी परिसर सुशोभित केला जाणार आहे. त्यादृष्टीने ही कारवाई सुरू आहे. ती संपल्यानंतर कल्याण रेतीबंदर परिसरात मेरीटाइम बोर्डाकडून एक भिंत उभारली जाणार आहे. दरम्यान, दुपारी माणकोली पुलाच्या उद्घाटनास मुख्यमंत्री आले होते. या कार्यक्रमानंतर डॉ. कल्याणकर दुपारी कल्याण रेतीबंदरात आले. तहसीलदार व २० जणांच्या ताफ्यासह त्यांनी बोटीने प्रवास सुरू केला. ही बोट डोंबिवलीला कोपर खाडीच्या दिशेने निघाली. बोट खाडीच्या पाण्यात बुडू लागताच अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला. जवानांनी तत्काळ खाडीमार्गे जिल्हाधिकाऱ्यांची बुडणारी बोट गाठून त्यांना वाचवले. यामुळे वेगवेगळ््या तर्कवितर्कांना उधाण आले. (प्रतिनिधी) डोंबिवलीत आजपासून कारवाईकल्याण रेतीबंदर येथील कारवाईनंतर आता रविवारपासून डोंबिवली येथील खाडी परिसरातील बेकायदा रेतीउपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.