शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा हगणदारीमुक्तीचा दावा खोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 01:02 IST

ठाणे जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याचा व स्वच्छतेबाबत केंद्राने महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्याला प्रथम क्रमांक घोषित केल्याबद्दल शाबासकी मिळवली जात आहे

बाळाराम भोईरठाणे जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याचा व स्वच्छतेबाबत केंद्राने महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्याला प्रथम क्रमांक घोषित केल्याबद्दल शाबासकी मिळवली जात आहे. परंतु, या कौतुकास खरोखरच ठाणे जिल्हा पात्र नाही, असा माझा अनुभव आहे. जिल्ह्यात विविध कमिट्या आल्या की, रंगरंगोटी करायची, रस्ते धुवायचे आणि शौचालयांना रंग लावायचा, असे करून स्वच्छता केल्याचा देखावा करायचा. मात्र, प्रत्यक्षात स्वच्छता झालेलीच नाही. ठाणे जिल्ह्यातील वस्तुस्थिती वेगळीच आहे. जिल्ह्यात हजारो शौचालये बांधली. परंतु, ग्रामीण भागातील अनेक शौचालये आजही बंद आहेत. जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईमुळे ही शौचालये बंद झाली आहेत. हजारो शौचालये अर्धवट अवस्थेत आहेत. अनेक शौचालये नादुरुस्त आहेत. शासकीय कार्यालयांमधील शौचालये बंद आहेत. सार्वजनिक शौचालयांत घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने कुणी तेथे पाऊल ठेवायला तयार नाही.

भिवंडी तालुक्यात यावर्षी एक हजार ९४४ वैयक्तिक शौचालये मंजूर झाली. त्यातील एक हजार ७०० लोकांनी कर्ज काढून कामे पूर्ण केली. परंतु, या सर्व लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम अजूनही मिळालेली नाही. २४४ शौचालये अपूर्ण, अर्धवट आहेत. हीच परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची आहे. घरातील सांडपाण्यासाठी शोषखड्डे धोरण बंद पडले. पाणीटंचाईमुळे लोक शौचालयात जाण्यापेक्षा बाहेर उघड्यावर जाणे पसंत करतात. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये अजूनही ४५ टक्के लोक व मुख्यत्वे महिला उघड्यावर शौचासाठी जातात. तरीही, ठाणे जिल्हा हगणदारीमुक्त कसा म्हणता येईल. शौचालयांची स्थिती व ठिकठिकाणचे घाणीचे साम्राज्य याचा नेमका सर्व्हे केल्यास ‘स्वच्छता दर्पण’ हा किताब मिळण्याबाबत साशंकता निर्माण होईल.(श्रमजीवी संघटनेचे महाराष्टÑाचे सरचिटणीस)- शब्दांकन : सुरेश लोखंडेकेंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने केलेल्या मूल्यांकनात राज्यामध्ये ‘स्वच्छता दर्पण’मध्ये ठाणे जिल्ह्याने प्रथम स्थान प्राप्त केले असले, तरी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील गावखेड्यांमध्ये घाणीचे साम्राज्य आजही पाहायला मिळते. असे असताना जिल्हा स्वच्छ कसा? कागदोपत्री आकडेवारी सादर करून ‘स्वच्छता दर्पण’मध्ये प्रथम स्थान मिळवले आहे किंवा कसे, असा संशय घ्यायला जागा आहे.

टॅग्स :thaneठाणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान