शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जि.प. च्या अध्यक्ष - उपाध्यक्षांसह पाच पंचायत समित्यांच्या सभापतींचा मुहूर्त निश्चित

By सुरेश लोखंडे | Updated: December 29, 2017 19:52 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी यांची तर कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी पंचायत समित्यांच्या सभापती - उपसभापतींच्या निवडीसाठी संबंधीत तहसिलदार यांच्यावर पिठासन अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जबाबदारी टाकली आहे.

ठळक मुद्देउमेदवारी अर्जही त्यास दिवशी सभागृहात भरावा लागणारजिल्हा नियोजन भवनात हा कार्यक्रम पार पडणार२९ डिसेंबर रोजी वृत्तप्रसिद्ध करून जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्षांच्या निवडीचा मुहूर्त निश्चित केला असता तो तंतोतंत खरा ठरला

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष - उपाध्यक्ष पदांसह जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांच्या सभापती - उपसभापती निवडीचा मुहूर्त जिल्हा प्रशासनाने निश्चित केला आहे. यामध्ये जि.प.चे अध्यक्षांची १५ ला तर ८ जानेवारीला म्हणजे एक आठवडा आधी सभापतींची निवड निश्चित करण्यात आली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी यांची तर कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी पंचायत समित्यांच्या सभापती - उपसभापतींच्या निवडीसाठी संबंधीत तहसिलदार यांच्यावर पिठासन अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जबाबदारी टाकली आहे. लोकमतने ‘यंदा जिल्हा परिषद सदस्यांच्या पळवापळवीची नेत्याना भीती’ या मथळ्याखाली २९ डिसेंबर रोजी वृत्तप्रसिद्ध करून जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्षांच्या निवडीचा मुहूर्त निश्चित केला असता तो तंतोतंत खरा ठरला आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम खरे म्हणजे येथील वर्तक सभागृहात होणे अपेक्षित आहे. पण हा सभागृह नादुरूस्त असल्यामुळे जिल्हा नियोजन भवनात हा कार्यक्रम पार पडणार आहे. पसंतीच्या उमेदवारास हातवर करून पाठिंबा द्यावा लागणार आहे. यासाठी व्हिडीओ चित्रीकरण देखील केले जाणार आहे. यासाठीचा उमेदवारी अर्जही त्यास दिवशी सभागृहात भरावा लागणार आहे. त्यानंतर छाननी, उमेदवारी मागे घेणे आणि त्यानंतर आवश्यकता असल्यास हातवर करून मतदान प्रक्रिया देखील एकाच दिवशी सभागृहात पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या या पहिल्या सभेचे पीठासन अधिकारी म्हणून ठाणे येथील उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी जबाबदारी पार पाडणार आहेत.जिल्ह्यातील पाच पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य आहेत. यासाठी पहिल्या सभेस त्यांची उपस्थिती आवश्यक असल्यामुळे त्यांची निवड एक आठवडा आधीच केली जाणार आहे. प्रत्येक पंचायत समिती सभागृहात पार पडणाऱ्यां  या निवड प्रक्रियेसाठी संबंधीत म्हणजेच शहापूर, कल्याण, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ तहसीलदार पीठासन अधिकारी म्हणून काम पहाणार आहेत. यासाठी संबंधीत जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांना निवड प्रक्रियेच्या पूर्व नियोजनाचे जिल्हा प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार