ठाणे : जिल्हा मध्यवर्ती बँकांना ५०० व १००० रूपयांच्या नोटा घेण्याची बंदी रिझर्व्ह बँकेने केल्याच्या विरोधात ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (टीडीसी) न्यायालयात जाणार आहे. मंगळवारी बँकेच्या संचालकांनी निदर्शने केली. बँकेच्या सुमारे २५ लाख तीन हजार ८४८ ग्राहकांना नाहक फटका बसल्याचे अध्यक्ष बाबा पाटील यांनी सांगितले. सहा दिवसांमध्ये टीडीसी बँकेने ४०० कोटी रूपयांच्या पाचशे, हजार रूपयांच्या नोटा जमा करून घेतल्या आहेत. (प्रतिनिधी)
ठाणे जिल्हा बँक न्यायालयात जाणार
By admin | Updated: November 16, 2016 05:42 IST