शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात ४,५८५ मतदारांनी पार केली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 23:48 IST

सर्वाधिक ७६३ मतदार डोंबिवलीत

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांसाठी नवीन मतदारयादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये ६६ लाख ३७ हजार ६७९ मतदारांचा समावेश आहे. यातील चार हजार ५८५ ज्येष्ठ मतदार शंभरी पार केलेले आहेत. यापैकी सर्वाधिक ७६३ मतदार डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आहेत.

जिल्ह्यातील काही महापालिकांच्या निवडणुका लवकरच हाती घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या मतदारांसाठी जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघाची मतदारयादी वापरली जाणार आहे. यास अनुसरून अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली असता, त्यात ६६ लाख ३७ हजार ६७९ जणांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे. यामधील ३६ लाख १० हजार ९३३ पुरुष मतदार असून ३० लाख २६ हजार २७२ महिला मतदारांना मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील या १८ विधानसभा मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रात चार हजार ५८५ ज्येष्ठ नागरी ९९ वर्षांपेक्षा जास्त वयाचे मतदार आहेत. या ज्येष्ठ मतदारांमध्ये दोन हजार ३५३ पुरुषांसह दोन हजार २३२ शंभरी पार केलेल्या महिला आजपर्यंत मतदानाचा हक्क बजावत आहेत. या वयोवृद्ध मतदारांमध्ये सर्वाधिक मतदार डोंबिवली विधानसभा मतदारसंघात ७६३ ज्येष्ठांचा या मतदारयादीत समावेश आहे. 

या खालोखाल कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात शंभरी पार केलेले मतदार अद्यापही मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकटी देत आहेत. या अंतिम मतदारयादीतही त्यांना मतदानाचा हक्क बहाल केलेला असून त्यांचे मतदान महत्त्वाचे मानले जाते.