शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जि. प.च्या अध्यक्षा सुषमा लोणेंचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : येथील ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे यांनी सोमवारी अध्यक्षपदाचा राजीनामा कोकण विभागीय आयुक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : येथील ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे यांनी सोमवारी अध्यक्षपदाचा राजीनामा कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे सुपूर्द केला आहे. शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींकडून आदेश झाल्यामुळे मी स्वखुशीने हा राजीनामा दिला, असे लोणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या तीन ते साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात अध्यक्षपदाच्या राजीनामा देणाऱ्या लोणे या शिवसेनेच्या तिसऱ्या महिला आहेत.

जिल्हा परिषदेवर शिवसेनेसह राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. यात अध्यक्षपदी सेनेच्या लोणे अध्यक्ष होत्या. सर्वांना अध्यक्षपदाची संधी देण्यासाठी सहा महिन्यांच्या मुदतीवर लोणे यांना संधी मिळाली होती. या राजीनाम्यासाठी कोणाचाही दबाव माझ्यावर आला नाही. सहा महिन्यांच्या कार्यकाळापेक्षा कोरोनामुळे मला दहा महिने अध्यक्षपदी संधी मिळाली आहे. यास अनुसरून पक्षश्रेष्ठींकडून आदेश मिळाल्यानंतर मी स्वखुशीने राजीनामा दिला, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षपदावरून पायउतार होणाऱ्या शिवसेनेच्या लोणे तिसऱ्या जि. प. सदस्या आहेत. उपाध्यक्षपदी मात्र शिवसेनेचे मुरबाड येथील सुभाष पवार कायम आहेत.‌ ते राष्ट्रवादीला रामराम ठोकून सेनेत दाखल झालेले आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी एसटी प्रवर्गाच्या महिला सदस्यांसाठी राखीव होते. यावेळी शहापूरच्या मंजूषा जाधव आणि भिवंडीच्या दीपाली पाटील यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर ओबीसी प्रवर्गातील महिला सदस्यांसाठी राखीव असलेल्या या अध्यक्षपदी कल्याणच्या विद्यमान अध्यक्षा लोणे यांना संधी मिळाली होती. आता पुढील सुमारे दीड वर्षांसाठी शिवसेनेकडून कोणत्या ओबीसी महिला सदस्यास अध्यक्षपदाची संधी मिळणार याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जात आहेत.

- अंबरनाथ तालुक्याला संधी मिळण्याची शक्यता

जिल्हा परिषदेच्या या सत्तेत शिवसेनेची सदस्य संख्या अधिक असल्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी सेनेच्या एसटी व ओबीसी महिलांना संधी मिळाली आहे. या पदासाठी शहापूर, भिवंडी आणि कल्याण या तालुक्यांना संधी मिळालेली आहे. आता अंबरनाथ तालुक्यातील ओबीसी महिलेला संधी मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.