शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात कोरोना रुग्णांचा मृत्युदर पाच टक्क्यांनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना आता मृत्युदरही वाढल्याचे दिसत आहे. यापूर्वी मृत्युदर दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना आता मृत्युदरही वाढल्याचे दिसत आहे. यापूर्वी मृत्युदर दोन टक्क्यांच्या आसपास होता. आता तो ७.३ टक्क्यांच्या घरात गेला आहे. परंतु, महापालिकेच्या दप्तरी मात्र रोज ५ ते सात जणांचेच मृत्यू होत असल्याची आकडेवारी दिली जात आहे. महापालिकेच्या जवाहरबाग स्मशानभूमीत रोजच्या रोज १५ ते २० मृतदेह जाळले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे, तर इतर दोन स्मशानभूमीतही रोजच्या रोज ८ ते १० मृतदेह येत असल्याची माहिती स्मशानभूमीत काम करणाऱ्या कामगारांनी दिली. त्यामुळे महापालिका पुन्हा मृत्यूंचा आकडा लपविते काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यातही गेल्या दोन दिवसांत ३५ मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. परंतु महापालिकेने तो फेटाळला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत ९५ हजार ७३७ कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर ७८ हजार ४६२ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एक हजार ४४४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. यापूर्वी महापालिका हद्दीत बाधित रुग्णांचा मृत्युदर हा दोन टक्क्यांच्या आसपास होता. आता तो ७.३ टक्क्यांच्या घरात गेला आहे. परंतु, हा आकडा केवळ महापालिकेच्या दप्तरी आहे. प्रत्यक्षात महापालिका हद्दीत रोजच्या रोज मृत्यूंचा आकडा वाढताना दिसत आहे. स्मशानभूमीत काम करणाऱ्या कामगारांशी या संदर्भात चर्चा केली असता, जेव्हापासून शहरात कोरोना वाढत आहे, तेव्हापासून आमचादेखील ताण वाढला असल्याचे ते सांगतात. परंतु त्यांनादेखील ही माहिती उघड न करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. ठाणे महापालिकेच्या एकट्या जवाहर बाग स्मशानभूमीत रविवारी सुमारे २० मृतांवर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली, तर मागील काही दिवसांत रोजच्या रोज १५ ते २० मृतदेहांना अग्नि देण्याचे काम केल्याचेही त्यांनी सांगितले. जवाहर बाग स्मशानभूमीत चार गॅस शवदाहिनी आहेत त्यामुळे येथे सध्या येथे येणाऱ्या मृतदेहांमुळे येथील कर्मचाऱ्यांवरील ताणदेखील वाढल्याचे दिसत आहे, तर उर्वरित वागळे आणि कळव्याच्या स्मशानभूमीतही रोजच्या रोज ८ ते १० कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे रोजच्या रोज सरासरी आकडा जरी काढला १५ ते २० मृत्यू होत असल्याचे दिसत आहे. परंतु, महापालिकेच्या दप्तरी रोज ५ ते ७च मृत्यू दाखविले जात आहेत. त्यामुळे महापालिका कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू लपवित आहे का, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. यापूर्वीदेखील मागील वर्षी अशाच प्रकारे पालिकेने मृत्यू लपविल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. त्यामुळे आता किती मृत्यू महापालिका लपविते आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शनिवारी एका दिवसात ग्लोबल रुग्णालयात सुमारे २० मृत्यू झाले असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. परंतु, पालिकेने हा दावा फेटाळला आहे. येथील रुग्णालयात दाखल एका रुग्णाने त्याच्या नजरेसमोरच आठ मृतदेह नेतांना पाहिले असल्याने त्याने ही माहिती दिली. परंतु, तसे काहीच झालेले नसल्याचा दावा महापालिकेने केला.

ठाण्यात एका खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा पहाटे ३ वाजता मृत्यू झाला होता. त्यानंतर सकाळी ९ वाजल्यापासून रुग्णाचे नातेवाइकांनी शववाहिनी मिळावी यासाठी फोन केला होता. परंतु, तब्बल सव्वापाच तासानंतर ती मिळाली. त्यानंतरदेखील स्मशानभूमीत नेल्यानंतर एक तास ताटकळत त्यांना थांबावे लागल्याची बाब समोर आली आहे. त्यातही शववाहिनी मिळावी यासाठी संपर्क साधल्यानंतर आधी शासकीय रुग्णालयातील मृतदेह आम्हाला न्यायचे आहेत, तेथील पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुमच्याकडे येऊ, असे उत्तर रुग्णांच्या नातेवाइकांना मिळाले होते. एकूणच यामुळे सध्या मृत्यूंचे प्रमाण किती आहे, शहरात हे यावरून दिसत आहे.

........

महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचा मृत्यूंचा आकडा लपविला जात नाही. महापालिकेकडे जेवढी नोंदणी होत आहे, तेवढेच दाखविले जात आहे.

संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा