शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

ठाण्याचा पारा  चढला, ४१ अंश सेल्सीअसवर गेला पारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 19:50 IST

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना दुसरीकडे शहरातील तापमानातही आता वाढ होतांना दिसत आहे. ठाणे शहराचे तापमान आज ४१ अंश सेल्सीएसवर गेले होते. तर मागील दोन ते तीन दिवसापासून ठाण्यात घरगुती वीजेच्या वापरातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

ठाणे - ठाणेशहराच्या कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतांन दुसरीकडे ठाण्याचा पाराही आता वाढतांना दिसत असल्याचे चित्र आहे. सोमवारी ठाणे शहरात तापमानाने ४१ अंशाचा पारा पार केला होता. मागील काही वर्षात शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी वाढलेल्या तापमानाचा फारसा त्रास मात्र जाणवला नाही. कारण कोरोनामुळे नागरीक घरातच लॉक डाऊन असल्याने तेवढा पार चढतांना दिसला नाही. परंतु नागरीक घरी असल्याने वीजेचा वापर वाढल्याचे मात्र दिसत होते. त्यामुळे शुक्रवार पासून ठाण्यासह, कळवा, मुंब्रा आणि दिव्यात अनेक भागात वीजेचा लंफडाव सुरु असल्याचे दिसत होते.                  एकीकडे ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १५० च्या जवळ आली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे आता ठाण्यात उन्हाचा पाराही वाढतांना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत असून आता नागरिकांना उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यातही दुपारच्या वेळी तापमान वाढत आहे. या वाढत्या उष्माने नागरीक घरात बसून हैराण झाले आहेत. सोमवारी २० एप्रिलला दुपारी बारा पासून सायंकाळी पाच पर्यंत शहरात उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला होता. ठाणे शहरात सोमवारी तापमानाने ४१ अंश सेल्सिअस तापमान होते. दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी शहरात ४१.०८ तापमानाची नोंद झाली. तर दिवसातील सर्वात कमी २८.०७ अंश सेल्सिअस तापमानाची सकाळी सात वाजता नोंद झाली. त्यानंतर दिवसभर तापमान सातत्याने वाढत होते. सध्या सर्वत्र संचारबंदी असल्याने नागरिकांना घरीच थांबावे लागत आहे. त्यात या वाढत्या उष्माने ते अधिकच हैराण झाले होते.दरम्यान वाढत्या उष्मामुळे घरात आता २४ तास फैन किंवा एसीचा वापर वाढू लागला आहे. तसेच वर्क फ्रॉम सुरु असल्यानेही घरगुती वीजेचा वापर वाढल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होतांना दिसत होता. रविवारी नौपाडयातील वीज पुरवठा खंडीत होता. तर सोमवारी देखील शहरातील काही भागांचा वीज पुरवठा खंडीत झाल्याचे दिसत होते. कळवा, मुंब्रा आणि दिव्यातही वीज पुरवठा खंडीत होत होता. 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाTemperatureतापमान