शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतून ठाण्याच्या गुन्हे शाखेने जप्त केला ४३ लाखांचा गुटखा

By जितेंद्र कालेकर | Updated: November 11, 2024 18:58 IST

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई: दोघांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याचा साठा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने भिवंडीतील वळगावमधील गोदामातून जप्त केल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी सोमवारी दिली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांच्याकडून ४३ लाख ६३ हजार ३७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने अंमली पदार्थांची शोध मोहीम राबवून त्यावर कारवाईच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त पाेलिस आयुक्त उगले, उपायुक्त शिवराज पाटील आणि सहायक पोलिस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विराेधी पथकाने ९ नोव्हेंबर २०२४ रोजी भिवंडीतील वळगाव भागातील पद्मावती कॉम्पलेक्समधील गोदाम क्रमांक जी- ४ मध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहूल म्हस्के, सहायक पोलिस निरीक्षक जगदीश गावीत, उपनिरीक्षक दीपक किणी, राजेंद्र निकम आणि मोहन परब आदींच्या पथकाने धाड टाकून बोल्ट फिल्टर तंबाखू, विविध कंपन्यांचा पानमसाला आणि तंबाखू असा ४३ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

हा सर्व गुटखा आणि पानमसाला विक्रीसाठी अवैधरित्या साठवणूक केल्याचे चौकशीमध्ये आढळले. याप्रकरणी गुटख्याची साठवूणक करणारा राजेश मिश्रा ( रा. मुलुंड मुबई ) आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध नारपोली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमातील कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी आरोपी मिश्रा याला अटक केली आहे.