शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील दाम्पत्याचा सेल्फी काढताना मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 05:41 IST

गुहागर तालुक्यातील हेदवी-बामणघळ हे प्रसिद्ध ठिकाण आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांना तेथे जाण्याचा माेह आवरता येत नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कगुहागर (जि. रत्नागिरी) : समुद्राच्या लाटांशी माैजमजा करताना ठाणे येथील पती-पत्नीला सेल्फी काढण्याचा माेह झाला आणि त्याच नादात त्या दोघांचाही डोंगरात घुसलेल्या समुद्रातील बामणघळीत पडून मृत्यू झाला. ही दुर्घटना गुहागर तालुक्यातील हेदवी येथे शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. अनंत माणगावकर (३६) आणि सूचना माणगावकर (३३) अशी दाेघांची नावे आहेत.

गुहागर तालुक्यातील हेदवी-बामणघळ हे प्रसिद्ध ठिकाण आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांना तेथे जाण्याचा माेह आवरता येत नाही. या ठिकाणी डोंगरामध्ये नैसर्गिक घळ तयार झाली आहे. या खोल घळीत समुद्राच्या लाटा उसळत असतात. त्याचे पर्यटकांना आकर्षण असते. अनंत आणि सूचना हे आई, मामेभाऊ यांच्यासमवेत फिरण्यासाठी गुहागरमध्ये आले हाेते. शनिवारी ते बामणघळ पाहण्यासाठी गेले. तेथे लाटांशी माैजमजा करत असताना अनंत आणि सूचना माणगावकर यांना सेल्फी काढण्याचा माेह झाला. सेल्फी काढत असताना पत्नीचा ताेल गेला. तिला पडताना पाहून अनंत यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातच त्यांचाही ताेल गेला आणि दाेघांचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पाेलीस पाटील, स्थानिक तरुण आणि गुहागरचे पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दाेघांचेही मृतदेह बाहेर काढले.