शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकर ठरवणार आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 01:51 IST

आरोप, प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीकरिता सोमवारी भरपावसात रांगा लावून रेकॉर्डब्रेक मतदान झाले

ठाणे : आरोप, प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीकरिता सोमवारी भरपावसात रांगा लावून रेकॉर्डब्रेक मतदान झाले. मतपेटीद्वारे मतदान असल्याने मतदारांना रांगेत अधिक काळ उभे राहावे लागत होते. प्रथमच चुरशीच्या झालेल्या या तिरंगी निवडणुकीत कोण विजयी होणार याचा कौल अर्थातच बहुसंख्येनी असलेला ठाण्यातील मतदार देणार आहे.कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यंदा प्रथमच रंगतदार ठरली आहे. प्रमुख लढत भाजपाचे निरंजन डावखरे, शिवसेनेचे संजय मोरे आणि राष्टÑवादीचे नजीब मुल्ला यांच्यात होत आहे. सोमवारी सकाळपासून तुफान पाऊस असूनही ठाण्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांचा कमालीचा उत्साह दिसून आला. जिल्ह्यात ५४ मतदान केंद्रावर मतदानप्रक्रिया सुरू होती. प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान करताना मोबाइल फोन जमा करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यामुळे सरस्वती शाळेच्या मतदान केंद्रावर मतदार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली; परंतु नंतर मतदारांनी पोलिसांच्या सुचना मान्य केल्या. पदवीधर पोलिसांना मतदान करण्यासाठी अर्ध्या तासाची सुट्टी देण्यात आली होती. काहींनी आधीच पोस्टल मतदानाचा हक्क बजावला होता. ईव्हीएम मशिनद्वारे होणाºया मतदानावर आक्षेप घेतले जात असताना या निवडणुकीत मतपेटीद्वारे मतदान केले गेले. मात्र त्यामुळे मतदान प्रक्रियेला होत असलेल्या विलंबाबाबत काही मतदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.मागील निवडणुकीत या मतदारसंघात ९० हजारांच्या आसपास मतदार होते. यावेळी १ लाख ४ हजार २६४ मतदारांची नोंद झाली. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या ही तब्बल ४५ हजार ८३४ एवढी आहे. शेजारील पालघर जिल्ह्यातील मतदारांची संख्या १६ हजार ९८२ एवढी आहे तर रायगड जिल्ह्यातील मतदारांची १९ हजार ९१८ एवढी आहे. रत्नागिरीतील मतदारांची संख्या १६ हजार २२२ एवढी आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची मतदारांची संख्या ही ५ हजार ३०८ एवढी आहे. येत्या गुरुवारी या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार ते स्पष्ट होईल.