शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

ठाणे शहराने घेतला अखेर मोकळा श्वास; ३५०० बॅनर, पोस्टर हटविले

By अजित मांडके | Updated: March 18, 2024 18:49 IST

पालिकेची अनाधिकृत बॅनर पोस्टरवर कारवाई, ३५०० बॅनर, पोस्टर हटविले, लोकसभा आचारसंहितेचा परिणाम

ठाणे : शहर विद्रुपीकरणात भर घालणारे राजकीय शुभेच्छांचे, कार्यक्रमांचे नेत्यांच्या वाढदिवसाचे बॅनर लोकसभेची आचारसंहिता लागताच निघाले आहेत. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नऊ प्रभाग समिती अंतर्गत सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरु करण्यात आली असून एका दिवसात ३५०० बॅनर, पोस्टर उतरविण्यात आले आहेत. त्यामुळे ठाण्याने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने का होईना मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्याच्या विविध भागात राजकीय बॅनर मोठ्या प्रमाणात झळकले होते. यात शासन आपल्या दारी, नमो महारोजगार मेळावा, विविध स्वरुपाची भुमीपुजने, लोकार्पणे, आपल्या आवडता नेता ठाण्यात येणार म्हणून लावण्यात आलेले स्वागताचे बॅनर यामुळे ठाणे शहर हे विद्रुपी झाले होते. किंबहुना ठाणे शहर हे या बॅनरबाजीमुळे गुदमरुन गेले होते. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून देखील या अनाधिकृत बॅनर पोस्टरवर कोणत्याही स्वरुपाची कारवाई केली जात नव्हती. मुख्य रस्त्यांवरील विद्युत खांबांवरही फलक लावले जातात. अशा प्रकारचे बॅनर लावण्यामध्ये राजकीय पक्षांचे नेते आघाडीवर असल्याचे दिसून येते. अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी पालिकेने शहरातील काही ठिकाणे निश्चित करून त्याठिकाणी बॅनर लावण्यासाठी परवानगी घेण्याची योजना सुरू केली होती. यानंतरही शहरात बेकायदा बॅनर लावण्याचे प्रकार सुरुच होते.दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होताच ठाणे महापालिकेने प्रभाग समितीनिहाय पथके नेमून बेकायदा बॅनर काढण्याची कारवाई सुरू केली आहे. सहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या पथकामार्फत ही कारवाई केली जात आहे. नऊ प्रभाग समिती अंतर्गत ही कारवाई सुरु आहे.  शनिवारपासून सुरू झालेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत ३ हजार ५६५ इतके राजकीय पक्षांचे बॅनर हटविण्यात आले आहेत.विधान सभा निहायओवळा-माजिवाडा -२४४ कोपरी-पाचपखाडी - ८८३, ठाणे विधानसभा - ६७४, कळवा-मुंब्रा विधानसभा-  १ हजार ४०४दिवा - ३६०  

पालिका मुख्यालयातील पदाधिकाºयांच्या कार्यालयांना लागले टाळे

ठाणे महापालिकेत दोन वर्षांपुर्वी प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यानंतर महापौर, उपमहापौर, सभागृह नेते तसेच इतर पदाधिकाºयांची कार्यालये यापुर्वीच टाळे लावून बंद करण्यात आली आहेत. असे असले तरी राजकीय पक्षांची कार्यालये मात्र सुरू होती. लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका मुख्यालयातील राजकीय पक्षांच्या कार्यालयांना प्रशासनाने टाळे लावले आहे. आचारसंहिता संपेपर्यंत ही कार्यालये बंद राहणार असल्याचे पालिकेने कार्यालयाना लावलेल्या नोटीसवर म्हटले आहे. तसेच कार्यालयाबाहेरील राजकीय पक्षांच्या फलकांना पेपर लावून झाकण्याची कारवाई पालिकेने केली आहे. त्यामुळे राजकीय मंडळी आता पालिका अधिकाºयांच्या ताबा घेतांना दिसून आले.

टॅग्स :thaneठाणेCode of conductआचारसंहिताElectionनिवडणूक