शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहर काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 00:10 IST

दोन गटांत वाद : श्रेष्ठींकडे केली तक्रार

ठाणे : ठाणे महापालिकेच्या विविध विभागांत सुरूअसलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून ठाणे शहर काँग्रेसचे रवींद्र आंग्रे यांनी आंदोलन पुकारले आहे. परंतु, ते काँग्रेसचे नसून त्यांचे वैयक्तिक असल्याचा दावा शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी केला. आंदोलन करण्यापूर्वी आंगे्र यांनी पक्षाला कोणत्याही प्रकारे विश्वासातच घेतले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ठाण्यात उरल्यासुरल्या काँग्रेसमध्येही उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागील पाच वर्षांत ठाणे महापालिकेत टीडीआर घोटाळा, १०० कोटींचा वर्तकनगर म्हाडा पुनर्विकास घोटाळा, कोट्यवधींचा शिक्षणखात्यातील घोटाळा, रस्तेबांधणी, घनकचरा, बीएसयूपी घरेवाटप आणि नालेसफाई असे विविध घोटाळे घडले असून यामध्ये पालिकेच्या एकाही अधिकाऱ्याला अद्याप शासन झाले नसल्याचा दावा आंग्रे यांनी केला आहे. मात्र, याबाबतचे पुरावे मागितले असता, त्यांना ते सादर करता आलेले नाहीत. परंतु, या घोटाळ्यांमध्ये केवळ पालिकेचेच अधिकारी दोषी असून लोकप्रतिनिधींबाबत बोलण्यास त्यांनी टाळाटाळ केली.

या घोटाळ्यांची सीबीआय व लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी व कारवाई व्हावी, या उद्देशाने येत्या १८ आॅगस्ट रोजी ठाणे महापालिका मुख्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर, २९ आॅगस्ट रोजी याच मागणीसाठी साखळी उपोषणही करणार असल्याचे सांगितले. या आंदोलनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे कोकण प्रभारी बी.एम. संदीप व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन हे सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले.वाद आणखी चिघळणारया आंदोलनास ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी आक्षेप घेतला असून याबाबत पक्षातील कोणत्याही पदाधिकाºयाला आंग्रे यांनी कल्पना दिली नसल्याचा दावा केला. यावरून आंग्रे यांनी छेडले असता, ही पक्षांतर्गत बाब असून यासंदर्भात श्रेष्ठींकडे शहराध्यक्षांची तक्रार केली असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, यानिमित्ताने ठाण्यातील उरल्यासुरल्या काँग्रेसमध्येही अंतर्गत दुफळी माजली आहे.