शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एसटी स्थानकांत शुकशुकाट, दुपारपर्यंत अवघ्या १३ बस सुटल्या; १०० टक्के प्रतिसाद, प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 06:22 IST

महाराष्ट्र परिवहन (एस टी) कर्मचाºयांनी ७ व्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या मंगळवारच्या बेमुदत संपाला ठाण्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

ठाणे : महाराष्ट्र परिवहन (एस टी) कर्मचाºयांनी ७ व्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या मंगळवारच्या बेमुदत संपाला ठाण्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या संपाची माहिती नसल्याने डेपोमध्ये आलेल्या शेकडो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान ठाणे विभागीय नियंत्रण कार्यालयांतर्गत येणाºया आठ विभागातील एसटी डेपोमध्ये शुकशुकाट दिसत येत असताना, दुपारपर्यंत या विभागातून अवघ्या १३ गाड्या सुटल्या. त्यामुळे एसटीचे दिवसभराचे जवळपास ५० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली. तसेच सोमवारी मध्यरात्री सुरू झालेल्या संपामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवल्याने डेपोंना छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.दरम्यान, संप काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने खाजगी बसना एसटी स्थानकातून प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, वंदना डेपोमधून दुपारपर्यंत अवघ्या ५ खाजगी गाड्या सातारा, पुणेकडे रवाना झाल्या. तर उर्वरीत ठिकाणी या खाजगी गाड्यांना प्रवासी मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.ठाणे विभागीय नियंत्रण कार्यालयांतर्गत ठाणे शहरातील दोन विभाग, भिवंडी, शहापूर, कल्याण, विठ्ठलवाडी अशा आठ विभाग येतात. त्या आठ विभागातून दिवसभरात ठाणे जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यात (लांब पल्ल्याच्या) सुमारे २,८०० गाड्यांच्या फेºया नियोजित आहेत. परंतु, मंगळवारी दुपारीपर्यंत होणाºया १, ३८३ फेºयांपैकी अवघ्या १३ गाड्या सुटल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये सर्वाधिक ११ गाड्या या शहापूर येथून सुटल्या असून ठाणे, खोपट आणि विठ्ठलवाडी डेपोतून प्रत्येकी एक गाडी सुटली होती.विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाºयांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली. त्यानुसार, सोमवारी मध्यरात्री १२ नंतर एसटी कर्मचाºयांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. मात्र, ठाणे, खोपट डेपोतून सोमवारी रात्री ११.३० नंतर एकही गाडी सुटली नव्हती. पण, मंगळवारी सकाळी ५.३० च्या सुमारास एक गाडी खोपट डेपोमधून सोडण्यात आली.पोलीस पाहून कर्मचारी भयभीतविविध मागण्यासाठी एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान अचानक रात्री पोलीस बंदोबस्त आणि पोलीस गाड्या पाहून कर्मचारी भयभीत झालेले दिसत होते. त्यांच्या मनात पोलीस पडकतात की काय या भीतीने घर केले होते.एकच गाडी सोडलीएसटी प्रशासनाच्या दडपणाखाली आणि चोख पोलीस बंदोबस्तात ठाणे-पुणे ही स्वारगेट गाडी पहाटे ५.३० च्या सुमारास सोडण्यात आली. सोडलेल्या गाडीच्या पुढे पोलीस व्हॅन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.३८ हजार कामगार सहभागीविभागीय नियंत्रण कार्यालयात असलेल्या ८ विभागात सुमारे ३८ हजार ९८ अधिकारी-कर्मचारी हजेरी पटलावर आहेत. जवळपास ३८ हजार कामगार संपात सहभागी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.अवघ्या ५ खाजगी गाड्या सुटल्याया संपामुळे खाजगी गाड्या सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार,वंदना डेपोमधून सातारा, पुण्याला जाणाºया ५ ते ६ गाड्या रवाना झायाा असून दुपारी ३ वाजेपर्यंत आणखी तीन गाड्या उभ्या होत्या. मात्र, प्रवासी संख्या कमी असल्याने त्या रिकाम्याच दिसत होत्या. तसेच बोरीवली येथेही खाजगी गाड्यांला प्रवासी मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.तातडीचे काम राहिलेश्रीवर्धनला जाण्यासाठी खोपट स्थानकात बस पकडण्यासाठी जेव्हा दुपारी आलो. तेव्हा समजले एसटी कर्मचाºयांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यावेळी येथे माहिती घेतली असता एकही बस सुटणार नसल्याने समजले. त्यामुळे पुन्हा घरी परतण्याची वेळ ओढवली. यामुळे तातडीने जाण्याचे राहून गेले.- सुशांत चव्हाण, प्रवासीगटागटाने कर्मचारी उभेसंपामुळे बसेस डेपोसह कार्यशाळेत बसेस उभ्या केल्या होत्या. याचदरम्यान, संपात सहभागी झालेले कामगार हे डेपो परिसरात गटागटात उभे राहिल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते.कार्यशाळेत शांततानेहमीच एसटी कार्यशाळांमध्ये कर्मचाºयांची होणारी वर्दळीचा आणि बसेस दुरुस्ती होणारा आवाज या संपामुळे मंगळवारी ऐकू येत नव्हता. त्यामुळे कार्यशाळांमध्ये शांतता पसरल्याचे दिसून आली.

टॅग्स :ST Strikeएसटी संप