शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ठाणे खाडीत ‘लांब चोचीचा पाणटिवळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 03:28 IST

गेल्या वर्षी फक्त तीन दिवसांसाठी ठाणे खाडीत पहिल्यांदाच आलेला लांब चोचीचा पाणटिवळा यावर्षी परत आला असून पक्षिनिरीक्षक आणि पर्यटकांना तो खुणावत आहे.

- महेंद्र सुके ठाणे : गेल्या वर्षी फक्त तीन दिवसांसाठी ठाणे खाडीत पहिल्यांदाच आलेला लांब चोचीचा पाणटिवळा यावर्षी परत आला असून पक्षिनिरीक्षक आणि पर्यटकांना तो खुणावत आहे.गेल्या आठवड्यात वाट चुकून आलेल्या राखाडी डोक्याच्या टिटवीने पक्षिमित्रांचा वीकेण्ड साजरा केल्यानंतर या आठवड्यात आलेल्या लांब चोचीच्या पाणटिवळ्याने (लाँग बिल्ड डोविचर) ठाणे खाडीत येणाºया दुर्मीळ पक्ष्यांच्या वैभवात भर घातली आहे. ठाणे खाडीत दिवसेंदिवस अनेक दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन होऊ लागले आहे. हा पाणटिवळा मागच्या वर्षी तीन दिवस ठाणे खाडीत पहिल्यांदा दिसला होता. आता तो परतून आला आहे. २७ फेब्रुवारीला एका पक्षिनिरीक्षकाने ठाणे खाडीत ‘डोविचर’ दिसल्याची नोंद केल्यानंतर त्यास बघण्याकरिता पक्षिप्रेमींनी ठाणे खाडीत गर्दी केली; परंतु तो दिसला नाही. गुरुवारी पक्षिमित्र आणि अभ्यासक डॉ. सुधीर गायकवाड-इनामदार यांना दुपारच्या सत्रात हा पाणटिवळा दिसला आणि त्याचे व्यवस्थित छायाचित्रण त्यांनी केले. उत्तर अमेरिकेच्या टुंड्रापासून ते सायबेरियापर्यंत विणीचा प्रदेश असणाºया या पक्ष्याचे स्थलांतर मध्य ते दक्षिण अमेरिकेपर्यंतच सीमित असते. पश्चिम युरोपमध्ये याच्या काही नोंदी आहेत.गॉडवीट (काळ्या शेपटीचा पाणटिवळा) या पक्ष्यापेक्षा आकाराने किंचित कमी असलेल्या, परंतु चोचीची लांबी त्यापेक्षा जास्त असलेल्या लांब चोचीच्या पाणटिवळ्याच्या भारतात फारच कमी नोंदी आहेत. महाराष्ट्रातही केवळ ठाणे खाडीतच त्याची नोंद झाली आहे. या दुर्मीळ पक्ष्याला बघण्यासाठी पुन्हा पक्षिमित्रांची गर्दी होणार आहे.