शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टिवल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:49 IST

किल्ल्याची दुरवस्था थांबविण्यासाठी, किल्ले संवर्धन आणि जतन व्हावे यासाठी अनुलोम, स्वत्त्व, प्रयास परिवर्तन आणि फोकाय या संस्थांनी एक पाऊल उचलले

ठाणे : किल्ल्याची दुरवस्था थांबविण्यासाठी, किल्ले संवर्धन आणि जतन व्हावे यासाठी अनुलोम, स्वत्त्व, प्रयास परिवर्तन आणि फोकाय या संस्थांनी एक पाऊल उचलले आहे. याची सुरुवात घोडबंदर किल्ल्याने होत असून यासाठी या किल्ल्यावर अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टिवल आयोजिला आहे. यावेळी विविध स्पर्धा या फेस्टिवलचे मुख्य आकर्षण असतील, अशी माहिती आयोजकांनी दिली.रविवार ४ मार्च रोजी घोडबंदर किल्ल्यावर हा महोत्सव होत आहे. दुपारी दोन ते पाच यावेळेत विविध स्पर्धा आयोजिल्या आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये इच्छुकांना विनामूल्य प्रवेश आहे. तिथीने येणाºया शिवजयंतीचे औचित्य साधून घोडबंदर गावातून किल्ल्यापर्यंत सायंकाळी सायकल रॅली आणि शोभायात्रेचे आयोजन व इतर कार्यक्र म होणार आहेत. सायंकाळी किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा विजेत्यांचे आणि नामवंत कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. ज्यात लोकनृत्य, पोवाडा, वक्तृत्व आणि किल्ल्याचा इतिहास सांगणारा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात घोडबंदर गावचे नागरिक बहुसंख्येने पारंपारिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. स्पर्धांमध्ये नावनोंदणीची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी आहे. आॅनलाईन फॉर्म भरून आपली नावे नोंदवू शकतात. स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी ँुाी२३@ॅें्र’.ूङ्मे या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. शाहिर निशांत अमर शेख, चित्रकार विजयराज बोधनकर, मंदार आणि प्रिती वाळुसकर, नृत्यांगना प्रज्ञा कोळी भगत अशा ३० हून अधिक नामवंत परिक्षकांचा सहभाग आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने कल्याण ते वसई दरम्यान असलेल्या जुन्या बंदरांवर आणि किल्ल्यांवर एक प्रकाशझोत टाकला जाईल आणि त्या सर्व ठिकाणाच्या जतन संवर्धनाची एक ब्लू प्रिंट तयार करता येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.