शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : वाळू असलेला ट्रक उलटला, दोन तास सर्व्हिस रोड झाला बंद

By अजित मांडके | Updated: March 9, 2024 15:40 IST

या अपघातामुळे तब्बल २-तासांहून अधिक काळ त्या रस्त्यावरील वाहतूक बंद होती.

ठाणे : अंदाजे ४ ते ५ ब्रास वाळू असलेला ट्रक उलटल्याची घटना शनिवारी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल सर्व्हिस रोडवर समोर आली. या अपघातामुळे तब्बल २-तासांहून अधिक काळ त्या रस्त्यावरील वाहतूक बंद होती. तर सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

कमलाकर डाकी यांच्या मालकीचा ट्रक मध्ये अंदाजे ४ ते ५ ब्रास वाळू घेऊन त्यावरील चालक सतिश वल्लेपवाड हा पडघा मार्गे घोडबंदर रोडवरील हिरानंदानी येथे जात होता. शनिवारी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल सर्व्हिस रोडने जाताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून सर्व्हिस रोडमधील डिव्हायडरला जाऊन ट्रक धडकला आणि उलटला. या अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तर घटनास्थळी कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे समोर आले.

तसेच अपघातग्रस्त ट्रक ०२-हायड्रा मशिनच्या साहाय्याने रोडच्या एका बाजूला करण्यात आला. तर वाळूचा ट्रक उलटल्यामुळे सर्व्हिस रोड वरती पडलेली वाळू जे.सी.बी. मशीनच्या मदतीने बाजूला करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी रोडवरती सांडलेल्या ऑईलवरती माती पसरवली. तर या घटनेने विवियाना मॉल सर्व्हिस रोड २ तासांहून अधिक काळ वाहतुकीसाठी बंद राहिल्याने नागरिकांचे हाल झाले.

टॅग्स :thaneठाणे