शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात 39 हजार 808 रुग्णांनी एका महिन्यात केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 23:54 IST

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर : एप्रिलमध्ये आढळले होते ४१ हजार २५ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन, पालिकेने सुरू केलेल्या विविध उपाययोजना आणि आतापर्यंत झालेले लसीकरण यामुळे ठाण्यात एप्रिल महिन्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी करण्यात त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. ठाणेकरांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब म्हणावी लागेल. एप्रिल महिन्यात ठाण्यात कोरोनाचे नवे ४१ हजार २५ रुग्ण आढळले असले, तरी याच कालावधीत तब्बल ३९ हजार ८०८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र, दुर्दैवाने १६३ जणांचा मृत्यू झाला.

ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत १ लाख १८ हजार ९२१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील १ लाख ७ हजार २४० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १० हजार ७० एवढी आहे. यातील ७ हजार १४१ म्हणजे ८० टक्के रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. विविध रुग्णालयांत २ हजार ५७७ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी १७१ व्हेंटिलेटरवर, ४८३ रुग्ण हे आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. एप्रिल महिन्यात ठाण्यात १६३ रुग्णांचा मृत्यू झाला. महापालिकेच्या माध्यमातून वर्षभरात १५ लाख २६ हजार ४०७ नागरिकांची कोरोना चाचणी केली. आजही दिवसाला पाच हजारांच्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत.

nठाण्यात सुमारे १५ दिवसांपूर्वी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्क्यांच्या आसपास होते. तेच आता, ९० टक्क्यांच्या आसपास आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कोरोनाला अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. nएकाला बाधा झाली तर त्याच्या संपर्कातील ३७ जणांना विलगीकरणात ठेवले जात आहे. लॉकडाऊनमुळेदेखील आता रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. शुक्रवारी शहरात ६८८ नवे रुग्ण आढळले असून १२८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली.nजानेवारी महिन्यापासून ठाण्यात लसीकरण मोहीम सुरू झाली. लसी योग्य प्रमाणात उपलब्ध झाल्या तर शहरातील ५६ केंद्रे सुरू असतात. आतापर्यंत ३ लाख २ हजार ६३७ जणांचे यशस्वी लसीकरण करण्यात आले.