शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Thane: दीड दिवसांच्‍या गणपती विसर्जनात १० टन निर्माल्‍य संकलित

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 21, 2023 14:05 IST

Thane Ganesh Mahotsav: प्रत्‍येक उत्‍सव हा हरित उत्‍सव व्‍हावा यासाठी गेली बारा वर्षे काम करीत असलेल्‍या समर्थ भारत व्‍यासपीठाच्‍या महानिर्माल्‍य अभियानाला गणेशभक्‍तांनी याही वर्षे उदंड प्रतिसाद दिला.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे - प्रत्‍येक उत्‍सव हा हरित उत्‍सव व्‍हावा यासाठी गेली बारा वर्षे काम करीत असलेल्‍या समर्थ भारत व्‍यासपीठाच्‍या महानिर्माल्‍य अभियानाला गणेशभक्‍तांनी याही वर्षे उदंड प्रतिसाद दिला. दीड दिवसाच्‍या गणेश विसर्जनाच्‍यावेळी यंदा १० टनाहून अधिक निर्माल्‍य भक्‍तांनी दान केले. यावर्षी निर्माल्‍यातील अविघटनशिल घटकांचे प्रमाण लक्षणियरित्‍या घट असल्‍याचे निदर्शनास आले आहे.

ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्‍यासपीठ गेली १२ वर्षे गणेशोत्‍सव काळातील निर्माल्‍य व्‍यवस्‍थापन करीत आहे. तलावांचे शहर असलेल्‍या ठाण्‍याने कृतीम तलाव व निर्माल्‍य व्‍यवस्‍थापन असे दोन अभिनव उपक्रम महाराष्‍ट्राला दिले आहेत. प्रत्‍येक उत्‍सव हा हरित उत्‍सव व्‍हावा व पर्यावरणाचे जतन, रक्षण तसेच सर्वधन व्‍हावे यासाठी समर्थ भारत व्‍यासपीठ नेहमीच प्रयत्‍नशिल असते यात ठाणे महानगरपालिका, रोटरी क्‍लब ऑफ ठाणे गार्डन सिटी तसेच प्रकल्‍प पुर्ननिर्माणचे सदस्‍य सहयोग देत असतात. दीड दिवसाच्‍या गणपतीत १० टनाहुन अधिक निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले आहे. या निर्माल्‍यावर प्रक्रिया करून त्‍याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे.

तसेच निर्माल्‍यातील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्‍यात येणार आहेत. यावर्षी अविघटनशिल घटक जसे की, प्‍लास्‍टीक, थर्मोकोल यांचे निर्माल्‍यातील प्रमाण लक्षणियरित्‍या कमी झाले असुन केवळ ४ टक्‍केच म्‍हणजे ४०० किलोच अजैविक कचरा आढळुन आला. गेल्‍या १२ वर्षांच्‍या सातत्‍यपुर्ण जनजागृती, कृतीरूप कार्यक्रमामुळे हे शक्‍य झाले आहे. यात पर्यावरणस्‍नेही गणेशभक्‍त व समर्थ भारत व्‍यासपीठाशी संलग्‍न सफाईसेवक महिलांचे अनन्‍यसाधारण असे योगदान लाभले आहे अशी प्रतिक्रिया समर्थ भारत व्‍यासपीठाचे संचालक सुजय कुलकर्णी यांनी व्‍यक्‍त केली. दीड दिवसांच्‍या गणपती सोबत पाच, सात आणि दहा दिवसांच्‍या गणपतीच्‍या विजर्सनाच्‍यावेळी देखील निर्माल्‍य संकलित करण्‍यात येणार आहे. तरी भाविकांनी तलावात,खाडीत निर्माल्‍य विसर्जित न करता ते विसर्जन घाटावर ठाणे महानगरपालिकेच्‍या निर्माल्‍य स्‍वीकार केंद्रात दान करावे असे आवाहन व्‍यासपीठाचे संचालक सुजय कुलकर्णी यांनी केले आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवthaneठाणे