शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात १० सिग्नल फ्लॅश मोडवर, पाच वर्षांत सव्वा कोटीचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 04:40 IST

शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होऊन निष्पाप नागरिकांना त्याची झळ सोसावी लागत आहे. त्याची जाणीव गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रखरतेने होत आहे.

सुरेश लोखंडे ठाणे : शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होऊन निष्पाप नागरिकांना त्याची झळ सोसावी लागत आहे. त्याची जाणीव गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रखरतेने होत आहे. यास स्वयंचलित सिग्नल यंत्राही जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. त्यावर, प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून ठाणे शहरातील सिग्नल यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरातील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर सुमारे २५ सिग्नल कार्यरत आहेत. मागील पाच वर्षांच्या कालावधीत या सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीवर एक कोटी २५ लाख ३६ हजारांची रक्कम खर्चही झाली आहे. मात्र, त्यातील केवळ १५ सिग्नल कार्यरत असल्याचा दावा केला जात असून १० सिग्नल फ्लॅश मोडवर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ते नादुरुस्त असल्याचे दिसून येत असल्याने येथील वाहतूक बेशिस्तीत व मनमानी धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहराची लोकसंख्या, त्यातील वाहन संख्या ही जीव घेणारी ठरत आहे. अपघातांचे प्रमाण लक्षात घेता वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे. त्यासाठी जागोजागी असलेली सिग्नल यंत्रणा सतर्क केल्यास वाहतूक पोलिसांवरील ताणही मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.गणेश चतुर्थीच्या मिरवणुकांप्रसंगी शहरातील बेशिस्त वाहतुकीचा फटका विघ्नहर्त्या गणरायालादेखील बसला आहे. तरीदेखील सिग्नल यंत्रणा व शहरातील वाहतूक सुरळीत असल्याचा दावा प्रशासनाकडून होत असल्याचे उघड झाले आहे. शहरात तीनहातनाका, अल्मेडा रोड, खोपटनाका, कॅटबरी, तुळशीधाम चौक, ब्रह्मांडनाका, विजय गार्डन, आनंदनगर, कासारवडवली, ओवळानाका, कोळशेत रोड, बाळकुम जकातनाका, जीपीओ, यशस्वीनगरनाका, वसंत विहार चौक आदी १५ सिग्नल सद्य:स्थितीत कार्यरत आहेत. मात्र, सर्वाधिक वाहतुकीचे चौक व नाक्यांवरील सिग्नल यंत्रणा कुचकामी असून ते केवळ फलॅश मोडवर कार्यरत आहेत. यामध्ये ईस्टर्न एक्स्प्रेस महामार्ग व एलबीएस महामार्ग, जुना आग्रा रोड आदींवरील वाहतुकीला तोंड देणारा टेलिफोन एक्स्चेंज चौकातील सिग्नल केवळ नामधारी आहे.याप्रमाणेच वागळे चेकनाका, मानपाडानाका, खारेगावनाका, कोर्टनाका, पाटीलपाडा चौक, संत गजानन चौक, तीन पेट्रोलपंप, मनीषनगर जंक्शन आणि काशिनाथ घाणेकर चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणचे सिग्नल फ्लॅश मोडवर असूनही ते कार्यरत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.