शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीसाठी ठाण्याचे ‘ब्रॅण्ड’ सेलिब्रेशन, ठाणे होणार लख्ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:44 IST

दिवाळीपूर्वी ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि अपघातमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार, शहरातील रस्त्यांची धुलाई, खड्डे बुजवणे, वॉल पेटिंग्ज, बॅरिकेट्स पेंटिग्ज, फुटपाथ, गार्डन धुलाई, तलावांची सफाई आणि एकूणच

ठाणे : दिवाळीपूर्वी ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि अपघातमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार, शहरातील रस्त्यांची धुलाई, खड्डे बुजवणे, वॉल पेटिंग्ज, बॅरिकेट्स पेंटिग्ज, फुटपाथ, गार्डन धुलाई, तलावांची सफाई आणि एकूणच चकाचक व विद्युत रोषणाईने ठाणे लख्ख चमकवण्यासाठी महापालिकेचे तब्बल ११० इंजिनीअर दिवसरात्र कामाला लागले आहेत. एकूणच ब्रॅण्ड ठाण्याचे ब्रॅण्डिंग करून ठाणेकरांबरोबर दिवाळीच जबरदस्त सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.शहराने स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू केली. परंतु, या स्मार्ट ठाण्यात आजही अनेक समस्यांना तोंड लागत आहे. खड्ड्यांतून मार्ग काढणे, घाणेरडे फुटपाथ, धुळीमुळे होणाºया प्रदूषणासह इतर समस्यांमुळे ठाणेकर पुरते हैराण आहेत. दिवाळीपूर्वी तरी यातून सुटका होणार का, असा सवाल त्यांच्याकडून होत आहे. ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी १० दिवसांपूर्वी सर्व विभागांच्या अधिकाºयांची बैठक घेऊन दिवाळीपूर्वी चांगले रस्ते, खड्डेमुक्त प्रवास, विद्युत रोषणाई आदी कामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आता नगरअभियंता अनिल पाटील यांनी तत्काळ याचे व्हिजन तयार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ११० इंजिनीअरची टीम आणि ६०० जणांचे पथक कामाला लागले आहे.शहरातील ३ लाख ५९ स्क्वेअर मीटर परिसरात पेटिंग्जचे काम सुरू झाले आहे. पालिका आयुक्तांनी ब्रॅण्डिंग ठाण्याच्या ज्या तीन छटा सांगितल्या आहेत. त्या पेटिंग्जच्या माध्यमातून उमटल्या जात आहेत. त्यानुसार, या कामी खाजगी लोकसहभाग घेतला जात आहे. तसेच यामध्ये शहरातील १४१ किमीचे ९८ रस्ते आणि २२ चौक हे या माध्यमातून चकाचक केले जात आहेत. या ठिकाणी रस्त्यावर पडलेले १७०० खड्डे बुजवण्याबरोबर डिव्हायडरसह बॅरिकेट्स पेंटिंग आदींसह फुटपाथ, रस्ते धुलाईचीदेखील कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. याशिवाय, फुटपाथच्या बाजूला असलेल्या झाडांनादेखील ९ इंचांपर्यंत रंगरंगोटी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांचे, चौकांचे रूपडे पालटणार आहे. याशिवाय, रस्त्यावरील डेब्रिज उचलणे, गटार साफ करणे, कचरा उचलणे, ही कामेही केली जात आहेत. याशिवाय, शहरातील मुख्य गार्डन, तलावांचीदेखील साफसफाई केली जात आहे. येत्या १३ आॅक्टोबरपर्यंत ही कामे केली जाणार असून यामध्ये झाडांवर विद्युत रोषणाई करणे, मोठे लाइट लावणे, हाय वे चकाचक करणे या याकामांचादेखील समावेश आहे. एकूणच एखादा नागरिक जेव्हा दिवाळीची पहिली अंघोळ करून घराबाहेर पडेल, तेव्हा त्याला ब्रॅण्डिंग ठाण्याचे सेलिब्रेशन पाहावयास मिळावे, हा मुख्य उद्देश असल्याची माहिती प्रभारी नगरअभियंता अनिल पाटील यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेdiwaliदिवाळी