शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाच्या शाळा होणार विनामूल्य सॅनिटाइज्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 01:04 IST

शाळांच्या ७८ इमारती : एक काेटी रुपये वाचणार

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे :  कोरोनाचे निर्बंध शिथिल होत असताना राज्य सरकारच्या निर्देशानुसार मुंबई व ठाणे शहरांतील शाळा लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या शाळांचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करावे लागणार आहे. ठाण्यातील १२४ शाळांच्या इमारतींसाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, शिक्षण मंडळ समिती सभापती योगेश जानकर यांनी केलेल्या विनंतीनंतर स्टार वन पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस या कंपनीने या कामासह पेस्ट कंट्रोलदेखील विनामूल्य करण्याचे मान्य केले आहे.

ठाणे महापालिकेच्या १२४ शाळा असून एकूण ७८ इमारतींमध्ये त्या भरतात. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून त्या बंद असून सात महिन्यांत ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. राज्याच्या अन्य भागांतील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या असल्या, तरी मुंबई महानगर क्षेत्रातील शाळांवरील निर्बंध कायम आहेत. गेल्या महिनाभरात कोरोनाचे संक्रमण कमी होत असल्याने या भागातील शाळा पारंपरिक पद्धतीने सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांत राज्य सरकारकडून त्याबाबतचे निर्देश येतील, अशी अपेक्षा आहे. परंतु, तत्पूर्वी शाळा सुरक्षित असल्याचा विश्वास पालकांमध्ये निर्माण करणे महत्त्वाचे आहे. तसे झाले तरच ते आपल्या पाल्यांना शाळेत धाडतील. त्यामुळे या शाळांच्या इमारती पूर्णतः सॅनिटाइज्ड करणे, शाळांमध्ये दैनंदिन वापरासाठी सॅनिटायझर्स पुरविणे, विद्यार्थ्यांना मास्कचा पुरवठा करणे आदी सुरक्षेच्या उपाययोजना अत्यावश्यक आहे. त्यानुसार जानकर यांनी नुकताच एका बैठकीत याबाबतचा आढावा घेतला. शाळांच्या इमारतींचे सॅनिटायझेशन करण्यासाठी त्यांनी स्टार वन पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेसचे संचालक परशुराम सुतार आणि स्वप्नील आमरे यांच्याशी संपर्क साधला होता. सर्व शाळांच्या इमारतींचे सॅनिटायझेशन करण्यासाठी एक कोटी रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित होता. परंतु, जानकरांच्या विनंतीनुसार या कामासह पेस्ट कंट्रोल विनामूल्य करण्याची तयारी स्टार वन पेस्ट कंट्रोलने दाखवली असून तसे पत्रही या कंपनीने शिक्षण मंडळाला दिले आहे.

सामाजिक जाणि‍वेतून मदत कोरोना संक्रमणाच्या काळात प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती बिघडली असली, तरी अनेक जण आजही सामाजिक जाणि‍वेतून यथाशक्ती मदतीचा हात पुढे करत आहेत. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्टार वन कंपनीने पुढे केलेला मदतीचा हात आमच्यासाठी अमूल्य आहे.    - योगेश जानकर,                   सभापती, शिक्षण समिती

 

टॅग्स :thaneठाणे