शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ठामपा शहरात नेट झीरोची संकल्पना राबवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:15 IST

ठाणे महापालिकेने मागील काही वर्षांपासून अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून विविध ठिकाणी सौरऊर्जेचा वापर सुरू केला आहे. सौर शहरीकरण योजना तसेच स्मार्ट सिटीअंतर्ग

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेने मागील काही वर्षांपासून अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून विविध ठिकाणी सौरऊर्जेचा वापर सुरू केला आहे. सौर शहरीकरण योजना तसेच स्मार्ट सिटीअंतर्गत नवीन व अपारंपरिक ऊर्जेवर आधारित विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. यापुढेही जाऊन नेट झीरो ही संकल्पना राबवण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. ठाणे महापालिकेची स्वत:ची वार्षिक विजेची गरज अंदाजे ९५० लक्ष युनिट एवढी आहे. नेट झीरो संकल्पना राबवण्यासाठी महापालिका क्षेत्रात नवीन व अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून विविध सेवांसाठी लागणाऱ्या वार्षिक वीज वापराइतकी वीज निर्माण करण्याचे पालिकेने आता निश्चित केले आहे. यासाठी सौरऊर्जेच्या माध्यमातून ६३ मेगावॅट क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. यापैकी १० मेगावॅट एकत्रित क्षमतेपैकी ६.५ मेगावॅट प्रकल्प उभारणीचे काम पालिकेने सुरू केले आहे. उर्वरित ५३ मेगावॅट क्षमता साध्य करण्यासाठी पालिकेने योग्य त्या तंत्रज्ञानावर आधारित व परिमाणीत तसेच उपलब्ध जागेला साजेशी नवीन व अपारंपरिक ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची पीपीपी तत्त्वावर टप्प्याटप्प्याने उभारणी करण्याची तयारी पालिकेने केली आहे. त्यानुसार, नेट झीरोचा प्रकल्प राबवण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेवर आधारित प्रकल्पांची उभारणी, संचलन, निगा, देखभाल करणाऱ्या कंत्राटदारांकडून पीपीपी तत्त्वावर स्पर्धात्मक निविदा मागवल्या जाणार आहेत. शहराच्या हवामानाला सर्वात योग्य व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच अपारंपरिक ऊर्जानिर्मिती प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या नेट मीटरिंग किंवा त्या वेळेस उपलब्ध असलेल्या धोरणांतर्गत विद्युत वितरण कंपनीशी जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महावितरण कंपनीच्या प्रचलित दरापेक्षा कमी दराने उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पालिकेचा फायदा होणार आहे. तसेच पालिकेला शहरातून होणाऱ्या हरित गृहवायूचे उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार आहे.