शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्लीच्या त्या २५० झाडांची कत्तल होणार!

By admin | Updated: August 27, 2015 00:07 IST

ठाकुर्लीतील मध्य रेल्वेच्या हद्दीतील २५० झाडांची कत्तल करण्यावर महापालिकेचे आयएएस आयुक्त ई. रवींद्रन यांनी बुधवारी शिक्कामोर्तब केले. दीड वर्षापासूनच्या या प्रलंबित

डोंबिवली : ठाकुर्लीतील मध्य रेल्वेच्या हद्दीतील २५० झाडांची कत्तल करण्यावर महापालिकेचे आयएएस आयुक्त ई. रवींद्रन यांनी बुधवारी शिक्कामोर्तब केले. दीड वर्षापासूनच्या या प्रलंबित विषयासह अन्य विषयांसंदर्भात महापालिकेत झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वनप्रेमी अशोक वैद्य आणि भाजपा गटनेते नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी त्यास कडाडून विरोध केला, परंतु त्यास न जुमानता त्या दोघांचा विरोध, अशीच नोंद करत अन्य सदस्यांच्या मताने रवींद्रन यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. आयुक्तांच्या या निर्णयाला चौधरी-वैद्य यांनी विरोध केला. पर्यावरणाचा ऱ्हास होत असतानाच अशी कत्तल होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. तसेच केडीएमसीतील डोंबिवलीचा प्रदूषणात देशात १४ वा क्रमांक असून राज्यात दुसरा आहे. विविध कारणांमुळे हरित लवादानेही येथील कंपन्यांना कोट्यवधींची पेनल्टी सुनावली आहे. ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. असे असतानाच आणखी ऱ्हास होणारा हा निर्णय घाईने घेण्यात येऊ नये, असेही ते म्हणाले. एवढेच नव्हे तर सचिवांनी मतदान घ्यावे आणि त्यानंतरच याबाबतचा निर्णय घ्यावा, असा आग्रह चौधरींनी केला. परंतु, सचिव सुभाष भुजबळ यांनी निर्णय घेण्याअगोदरच एका सदस्याने त्यास मोडता घालत विरोध करून आयुक्तांना निर्णय घेण्यास भाग पाडल्याची टीकाही त्यांनी केली.(प्रतिनिधी) आयुक्तांचा जावईशोध..या वेळी माहिती देताना आयुक्त म्हणाले की, रेल्वेचा त्या ठिकाणी होणारा प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. तसेच तेथे जी झाडे आहेत, त्यापासून केवळ टिंबर मिळेल. उरला प्रश्न आॅक्सिजनचा, तर त्यातून केवळ २ टक्क्याहून कमी आॅक्सिजन मिळेल. खरा आॅक्सिजन हा सागरी परिसरातून मिळत असतो. असे स्पष्टीकरण देत त्यास मंजुरी दिल्याचे चौधरी म्हणाले. मात्र, समुद्रापासून मिळणारा आॅक्सिजन हे पहिल्यांदाच ऐकण्यात आले असून ज्ञानात भर पडल्याचे चौधरी म्हणाले. तसेच आयुक्तांच्या या माहितीबद्दल जावईशोध अशी खोचक टीकाही त्यांनी केली.