शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्लीत अडथळ््यांची शर्यत

By admin | Updated: April 11, 2017 02:28 IST

रेल्वेच्या इतिहासातील महत्त्वाच्या व नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या मेकओव्हरला सुरुवात झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला होम

डोंबिवली : रेल्वेच्या इतिहासातील महत्त्वाच्या व नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या मेकओव्हरला सुरुवात झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला होम प्लॅटफॉर्म, कल्याण दिशेकडील पादचारी पूल आणि तिकीटघराचे रविवारी उद्घाटन झाले. मात्र अनेक कामे शिल्लक असल्याने तेथील अडथळ््यांची शर्यत कायम आहे. संपूर्ण स्थानकाचा विकास होण्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.कल्याण दिशेच्या नव्या पादचारी पुलामुळे दिलासा मिळाला असला, तरी सध्या तो होम प्लॅटफॉर्मलाच जोडण्यात आला आहे. काम पूर्ण झाल्यावर तो जुन्या फलाटाला जोडला जाईल. तोवर सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना रुळ ओलांडूनच फलाट गाठावा लागेल किंवा नवीन पुलाने होम प्लॅटफॉर्मवर उतरून कल्याण दिशेकडील लोकलमधून फलाट ओलांडण्याचा द्राविडी प्राणायाम करावा लागणार आहे. बहुतांश गर्दी डोंबिवली दिशेच्या फाटकातूनच येते. त्यामुळे नवीन पुलाचा वापर सध्या मर्यादित आहे. पण होम प्लॅटफॉर्म डोंबिवली दिशेच्या पुलाला जोडलेला नाही. त्यामुळे तेथे पोचणे त्रासदायक आहे. नव्या फलाटावरून थेट फाटकापाशी जाण्याची सोय नाही. गेटमनच्या चौकीमागून दोन-चार केबिन व स्टोअर रूमला वळसा घालून फलाटात शिरावे लागत आहे. नवीन तिकीट घरही होम प्लॅटफॉर्मवर असल्याने पूर्वेतील प्रवाशांना रोज हा वळसा घालावा लागेल. तिकीट काढल्यानंतर मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फलाटावर पोचणे काही काळ तरी त्रासाचे ठरणार आहे. त्यामुळे पूर्व बाजूला डोंबिवलीच्या दिशेला तिकीट घर बांधण्याची मागणी पुढे येत आहे. पूर्वेला कल्याणच्या दिशेला बांधण्यात येत असलेल्या तिकीट घराचे कामही सध्या सुरू आहे. (प्रतिनिधी)फलाटात गॅपरूळ सरकवल्यामुळे होम फलाट (१-अ) आणि जुना (क्र. १) या फलाटातील अंतर वाढले आहे. प्रवासी सोयीनुसार जुन्याच फलाटावर उतरतात. त्यामुळे प्रवाशांनी तेथे उतरू नये, अशी जागृती रेल्वे करत आहे. त्यासाठी फलक लावले आहेत. मात्र, ते उंचावर असल्याने प्रवाशांच्या नजरेस पडत नाहीत. अवजड वाहनांना प्रवेश बंदीरेल्वे फाटकात होणारी कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहनांना फाटकातून जाण्यावर डोंबिवली शहर वाहतूक उपविभागाने बंदी घातली आहे. त्याऐवजी त्यांना कोपर ओव्हरब्रिजचा पर्याय दिला आहे. मात्र, वाहनचालकांनी तो धुडकावल्याने फाटक दीर्घकाळ खुले राहात आहे.