शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाकुर्ली पुलाची आता जबाबदारी पालिकेवर, कोपर पूलही कमकुवत : एलेव्हेटेड पुलाची निविदा रखडलेली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 06:50 IST

कोपरचा पूल कमकुवत झाल्याने ठाकुर्लीतील उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्याचे काम कल्याण-डोंबिवली पालिकेला करावे लागेल. त्यासाठी रेल्वेमार्गावरून गर्डर टाकण्याचे काम रेल्वेने वेळेत पूर्ण केले आहे. मात्र, या उड्डाणपुलाला जोडून असलेल्या महत्त्वाच्या एलेव्हेटेड रोडच्या कामाला पालिकेने अजून सुरुवातही केलेली नाही.

डोंबिवली : कोपरचा पूल कमकुवत झाल्याने ठाकुर्लीतील उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्याचे काम कल्याण-डोंबिवली पालिकेला करावे लागेल. त्यासाठी रेल्वेमार्गावरून गर्डर टाकण्याचे काम रेल्वेने वेळेत पूर्ण केले आहे. मात्र, या उड्डाणपुलाला जोडून असलेल्या महत्त्वाच्या एलेव्हेटेड रोडच्या कामाला पालिकेने अजून सुरुवातही केलेली नाही.गर्डरच्या कामासाठी घेतलेल्या मेगाब्लॉकची कल्पना असल्याने आणि पावसामुळे प्रवाशांची संख्या कमी होती. तरीही, रिक्षाचालकांनी कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांत अव्वाच्या सव्वा भाडे आकारत प्रवाशांची लूट केली. या मार्गावरील भाडे न ठरल्याचा फायदा उचलत रिक्षाचालकांनी प्रवाशांची कोंडी केली. बहुतांश चालकांनी समांतर रस्त्याने रिक्षा नेल्याने या रस्त्यावर वाहतूककोंडी होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहनसेवेच्या बसने ११२ फेºया केल्या. ही व्यवस्था सुरळीत आहे की नाही, याची पाहणी महापौर राजेंद्र देवळेकर, परिवहन समितीचेसभापती संजय पावशे यांनी केली. मात्र, अनेक प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकमधून चालत जाऊन डोंबिवली व कल्याण स्थानक गाठले.रेल्वेच्या हद्दीतील गर्डर टाकण्याचे काम १२ कोटींचे होते. त्याचा निम्मा खर्च कल्याण-डोंबिवली महापालिकेने उचलला. गर्डरनंतर आता पुलाचे काम पूर्ण करून डोंबिवली स्थानकाच्या दिशेने दिवाळीपर्यंत वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे. मात्र, एलेव्हेटेड रस्त्याच्या कामाची निविदा अद्याप पालिकेने काढलेली नाही. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचे घोंगडे अद्याप भिजत पडले आहे. त्याचा खर्च ४० कोटी आहे. या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाल्यावर ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील फाटक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे दररोज लोकल वाहतूक खोळंबते.डोंबिवली- कोपरदरम्यानचा रेल्वेचा उड्डाणपूल धोकादायक बनला असून सध्या त्याच्यावरच वाहतुकीचा ताण आहे. ठाकुर्लीचा उड्डाणपूल सुरू झाल्यास कोपरच्या पुलावरील वाहतूक तेथे वळवता येईल. या पुलाची डागडुजी गरजेची असल्याने त्यासाठी पुरेसा वेळ देता येईल किंवा गरजेनुसार हा धोकादायक बनलेला पूल पाडून नव्याने बांधण्याचे नियोजनही पालिकेला करता येईल.