शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रंगला सखी महोत्सव २०१७

By admin | Updated: April 29, 2017 01:39 IST

लोकमत सखी मंच आयोजित पॉवर बाय बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स सखी महोत्सव २०१७ मोठ्या उत्साहात पार पडला.

ठाणे : लोकमत सखी मंच आयोजित पॉवर बाय बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स सखी महोत्सव २०१७ मोठ्या उत्साहात पार पडला. बुधवारी ठाण्यातील वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या महोत्सवाला महिलावर्गाचा उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी मेहंदी, वेशभूषा, पाककला तसेच एकल नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सच्यावतीने स्वाभिमान या विशेष मोहिमेंतर्गत महिलांना सशक्तीकरणाचे धडे देण्यात आले.सखींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धाआणि आकर्षक बक्षीसांची लयलूट बक्षीसांची लयलूट, हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. कला, नृत्य क्षेत्रातील तज्ञांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. यामध्ये टॅन्ट्रम अ‍ॅकेडमीचे चंद्रकांत रायकर, स्वरा फुड्सच्या अनुश्री जोशी, आरती शिंदे, उमा बनसोडे या परिक्षकांचा समावेश होता. एकल नृत्याकरिता ५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. या स्पर्धेत स्नेहा काटे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर अश्विनी पाठक यांनी दुसरा क्रमांक आणि उमा पराते यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. वेशभूषा स्पर्धेत राजश्री शिरसाट या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या तर रसिका मेंगळे द्वितीय आणि स्वाती कर्णेकर यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. मेहंदी स्पर्धेत रंजना पगार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर निलिमा सावळे यांनी द्वितीय आणि प्रतिमा दिक्षित यांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पाककला स्पर्धेत मनिषा चितळे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तर सुलभा विचारे यांना दुसऱ्या आणि उमा देशमुख यांनी तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या कार्यक्रमात लोकमत सखी मंच परिवारातील महिला सभासदांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत विविध कला सादर केल्या. सखी मंचच्या माध्यमातून मिळालेल्या या व्यासपीठामुळे उपस्थित सखींनी लोकमतचे विशेष आभार मानले. या कार्यक्रमादरम्यान बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सच्या वतीने स्वाभिमान ही विशेष मोहिम राबविण्यात आली. कमीत कमी वेळा जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल. कुटुंबाला आर्थिक हातभार लावून स्वावलंबनाचे धडे देण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी स्वत:चे अनुभव मांडत इतर महिलांना करिअर घडविण्याची प्रेरणा दिली. उपस्थित महिलांसाठी प्रश्न मंजुषाच्या माध्यमातून बक्षीसे जिंकण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती. बिर्ला सनलाईफच्या वतीने महिलांना प्रेरणा देण्याकरिता विशेष चित्रफीत या ठिकाणी दाखविण्यात आली. या समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित महिलां सशक्तीकरणाचे धडे देत एक उत्तम करिअर घडविण्याचा मोलाचा सल्ला दिला. (प्रतिनिधी)