शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

ठाण्यात एकहाती सत्तेचे स्वप्न सेना साकारणार?

By admin | Updated: June 20, 2016 02:01 IST

मागील काही वर्षात ठाण्याच्या बाबतीत शिवसेनेची रणनिती बदलू लागली असून निष्ठावतांना डावलणे, उपऱ्यांना पक्षात घेऊन त्यांना संधी देणे, मुस्लीम बहुल वस्तीसाठी वेगळी व्यूहरचना करणे

मागील काही वर्षात ठाण्याच्या बाबतीत शिवसेनेची रणनिती बदलू लागली असून निष्ठावतांना डावलणे, उपऱ्यांना पक्षात घेऊन त्यांना संधी देणे, मुस्लीम बहुल वस्तीसाठी वेगळी व्यूहरचना करणे, परप्रांतियांना संधी असा बदल २०१२ पासून झाला आहे. परंतु आता त्यांच्याच मित्रपक्षाने कुरघोडी करण्याचे ठरवल्याने, शिवसेना देखील एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी, बेरजेच्या राजकारणाला महत्त्व देऊ लागली आहे. परंतु त्यात ती कितपत यशस्वी होणार आणि २०१७ मध्ये एकहाती सत्ता आणून सुर्वण महोत्सवी वर्षाची भेट ‘मातोश्री’ला देते का? याबाबतची उत्सुकता दिवसागणिक शिगेला पोहचत आहे. ठाण्यात सर्वप्रथम सत्ता मिळाल्याने ८० टक्के समाजकारणाची राजकारणाशी कशी सांगड घालावी हे या शहराने शिवसेनेला दाखवून दिले. नगरपालिकेच्या राजकारणातून ठाण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांत शिरकाव केलेल्या शिवसेनेचा ठाणे जिल्ह्यात विस्तार म्हणा किंवा घोडदौड म्हणा सुरू झाली, ती ठाणे लोकसभेचा मतदारसंघ भाजपाकडून हिसकावून घेतल्यानंतर. राम कापसे यांच्या ताब्यात असलेला हा विस्तीर्ण मतदारसंघ शिवसनेने युतीच्या वाटाघाटीत पदरात पाडून घेतला आणि मतदारसंघाच्या विस्ताराइतकीच पक्षाची ताकदही विस्तारत नेली. अडीअडचणीला धावून येणारी, अ‍ॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून मदतीचा हात देणारी, प्रसंगी ‘अरे’ ला ‘कारे’ करणारी आणि महागाईच्या काळात स्वस्तात तेल-डाळी-साखर अशा वस्तू पुरवत आधी संघटना म्हणून आणि नंतर पक्ष म्हणून शिवसेना घराघरात पोचली. सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून यायचे आणि गरजेनुसार आपण उभे केलेले-आपल्याला पाठींबा दिलेले अपक्ष, छोटे पक्ष यांच्या मदतीने सत्ता टिकवायची ही शिवसेनेची शैली. ठाणे हे मुंबईला खेटून असले तरी तेथील राजकारणाचा प्रभाव शिवसेनेने येथील राजकारणावर पडू दिला नाही. सुरूवातीला जनसंघाशी संघर्ष असला तरी त्यांच्याशीही जुळवून घेतले. सत्ता मिळवणे, ती टिकवणे हे एकमेव उद्दीष्ट असल्याने मुंबईत दिली नसली, तरी येथे मनसेची टाळी घेतली गेली, कधी बसपाला जवळ केले गेले; तर कधी रिपब्लिकन पक्षांना. त्यामुळे सत्तेच्या वळचणीतून शिवसेना विस्तारत राहिली. शिवसेनेच्या विस्तारात सिंहाचा वाटा आनंद दिघे यांचा होता आणि त्यानंतर आताच्या काळात एकनाथ शिंदे यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांच्या काळात शिवसेना बहरली, फोफावली आणि भक्कम झाली. आक्रमक संघटन आणि अविरत समाजकारण ही शिवसेनेची बलस्थाने आहेत. पूर्ण बहुमत नसले तरी बेरजेचे राजकारण करत सत्ता कशी टिकवावी हे शिवसेनेचे कौशल्य असल्याचे गेल्या दोन दशकांत सतत दिसून आले. संघटना म्हणून एकजिनसीपणाने काम करणे हेही शिवसेनेचे आणखी एक वैशिष्ट्य.शिवसेना ठाण्यात फोफावली असली, सत्तेची दोरी तिच्या हाती असली तरी ठाणे शहराचा अपेक्षित विकास न झाल्याचा ठपका शिवसेनेवर ठेवला जातो. झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणाच्या गरजा, लोकांच्या अपेक्षा समजून घेण्यात शिवसेना खूप कमी पडली. नागरीकरणातील उच्च मध्यमवर्ग, त्यावरील वर्गाचा विचार फारसा शिवसेनेकडून झालेला नाही. संघटनेकरिता राबणारा शिवसैनिक आणि सत्ता उपभोगणारे नगरसेवक यांच्यातील ठसठसणारे मतभेद वेळोवेळी समोर येतात. २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा विचार केल्यास, या निवडणुकीत शिवसेनेची सत्तेची गणिते जुळविण्यासाठी ऐनवेळेस निष्ठावंतांना डावलून इतर पक्षातून आलेल्यांना संधी दिल्याने निष्ठावान शिवसैनिक नाराज झाला होता. या नाराज शिवसैनिकाने थेट लेखी स्वरुपात मातोश्रीला तक्रार देखील केली होती. परंतु फोडाफोडीचे राजकारण करुनही शिवसेनेला सत्तेची गणिते जुळविण्यासाठी मनसेच्या कुबड्या हाती घ्याव्या लागल्या होत्या. परंतु २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपा भलताच फोफावल्याने त्याचा धसका सेनेने घेतला आहे. विशेष करून कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता खेचून आणण्याचे शिवसेनेचे दावे भाजपाने उधळून लावले. त्यामुळे आता शिवसेनेत चलबिचल सुरु झाली आहे. ठाण्यात जर अशी परिस्थिती ओढवली तर काय करायचे असा पेच त्यांच्या पुढे उभा ठाकला आहे.शिवसेनेला स्थापन होऊन आता ५० वर्षांचा काळ लोटला. शिवसेनेला सत्तेचा पहिला मान ठाणे शहराने दिला. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे वर्षानुवर्षांचे घट्ट समीकरण आहे. ठाणे महापालिका स्थापना झाल्यापासून आजपर्यंतचा इतिहास तपासला तर, ठाण्याने जरी शिवसेनेला सत्तेचा अधिकार बहाल केला असला तरी आजपर्यंत शिवसेनेला कधीही एकहाती हुकुमत ठाण्यावर गाजवता आलेली नाही. सत्तेकरिता शिवसेनेने राजकारणाचा टक्का वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ सत्ता कशी मिळविता येईल हेच उद्दीष्ट ठेवले असल्याने वेळप्रसंगी सत्तेसाठी टोकाची भूमिका घेण्याची तयारी शिवसेनेने सुरु केली आहे. शिवसेनेत निष्ठावंतांना वारंवार डावलले जात असले तरी देखील, तेही केवळ एका आदेशावर सर्व नाराजी गिळून पक्षाने उमेदवार म्हणून दगड जरी दिला असला तरी त्याला शेंदूर फासून देव बनवण्याकरिता सज्ज असतात, हे ‘मातोश्री’ने जाणले आहे. आता पुन्हा त्याच निष्ठावतांना आदेश देऊन कामाला लावण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यातही शिवसेनेत गटतटाचे राजकारण असेल तरी निवडणुकीच्या वेळेस एकत्र येऊन जोमाने काम करवून घेण्याचे कसब ठाण्यातील शिवसेना नेतृत्वाच्या अंगी आहे. मित्रपक्ष भाजपाचे आक्रमण परतावून लावत ठाण्यातील शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्षात तरी, एकहाती सत्ता स्थापन करण्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.